Header Ads

 • ताजा खबरें

  लहान मुलींवर अत्याचार करणार्‍यांचा एन्काऊंटर करा

   

  There are incidents of atrocities against young girls in many places in the state. Protests were staged in Thane on behalf of Ripai Ektawadi demanding that if the perpetrators of such atrocities are to be confronted on the lines of Andhra Pradesh. Currently, incidents of abuse against young girls are on the rise. A five-year-old tribal girl was tortured to death in a village in Bhokar taluka of Nanded district a few days after the atrocity. Protests were staged in front of the District Collector's Office under the leadership of District President Rajabhau Chavan under the guidance of Ripai Ektawadi Youth State President Bhaiyasaheb Indise. There was a strong protest against the state government's women's policy and the implementation of the Shakti Act. On this occasion, Bhaiyasaheb Indise said that due to the outbreak of people in the incident at Pen, the case has been transferred to the speedy court and Ujjwal Nikam has been appointed as the special public prosecutor. The same criteria has not been applied to the incident in Nanded. However, as both the incidents are a disgrace to humanity, Babu Sangerao should be sentenced to death in accordance with the Shakti Act. Going beyond that, we have to confront the perpetrators of atrocities against young girls; So that such narcissists would be relieved, he demanded. In this agitation, Uttamrao Khadse, Ravi Vanjare, Sunil Sadavarte, Rajan Girap, Shanil Dede, Vicky Ramraje, Shekhar Ramraje, Kisan Paikrao, Bhagwan Karnahale, Sandeep Shelke, Gautam Kamble, Amol Paikrao, Ravi Dongre, Gajanan Tarpe, , Vijay Wahule, Arun Hatkar, Milind Paikrao, Raju Chaure, Harish Yadav, Rakesh Rajbhar, Ramesh Barde, Baban Kamble, Nagsen Harne, Santosh Dhongade, Pravin Paikrao, Shivaji Waghmare, Anil Athavale, Avinash Narwade, Pyarelal Bhau, Bhimrao Manohar etc. Was done.

  राज्यात अनेक ठिकाणी लहान मुलींवर अत्याचाराच्या घटना घडत आहेत. अशा नराधमांना वचन बसवायचा असेल तर चिमुरड्यांवर अत्याचार करणार्‍यांचा आंध्र प्रदेशच्या धर्तीवर एन्काऊंटर करावा, या मागणीसाठी रिपाइं एकतावादीच्या वतीने ठाण्यात निदर्शने करण्यात आली.
  सध्या लहान मुलींवर अत्याचाराच्या घटना वाढू लागल्या आहेत.  पेण येथील आदिवासी मुलीवर झालेल्या अत्याचारानंतर काही दिवसातच नांदेड जिल्ह्यातील  भोकर तालुक्याच्या दिवशी या गावात एका पाच वर्षीय आदिवासी मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली. या घटनेच्या निषेधार्थ रिपाइं एकतावादीचे युवक प्रदेशाध्यक्ष भैय्यासाहेब इंदिसे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष राजाभाऊ चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.
  यावेळी राज्य सरकारच्या महिला धोरणाविरोधात तसेच शक्ती कायद्याची अंमलबजावणी करावी, यासाठी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
  या प्रसंगी भैय्यासाहेब इंदिसे यांनी सांगितले की,   पेण येथील घटनेत लोकांचा उद्रेक झाल्याने हा खटला जलदगती न्यायालयात वर्ग करण्यात आला असून विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती केली आहे.  हाच निकष नांदेड मधील घटनेबाबत लावण्यात आलेला नाही.  तरी , दोन्ही घटना मानवतेला काळीमा फासणार्या असल्याने पेणप्रमाणेच नांदेड येथील अत्याचार प्रकरणी खटला जलदगती न्यायालयात चालवून शक्ती कायद्यानुसार  बाबू सांगेराव या नराधमास फाशीची शिक्षा द्यावी; त्याही पुढे जाऊन लहान मुलींवर अत्याचार करणार्‍यांचा एन्काऊंटरच करावा; जेणेकरुन अशा नराधमांना वचक बसेल, अशी मागणी केली.
  या आंदोलनात रिपाइं एकतावादीचे राष्ट्रीय सरचिटणीस उत्तमराव खडसे, रवी वंजारे, सुनील सदावर्ते, राजन गिरप, शनिल देढे,  विकी रामराजे, शेखर रामराजे, किसन पाईकराव,भगवान कर्‍हाळे, संदीप शेळके, गौतम कांबळे, अमोल पाइकराव, रवी डोंगरे, गजानन टारपे, कैलास बरडे, विजय वाहुळे, अरुण हाटकर, मिलींद पाईकराव, राजू चौरे, हरीष यादव, राकेश राजभर, रमेश बरडे, बबन कांबळे, नागसेन हरणे, संतोष धोंगडे, प्रविण पाइकराव, शिवाजी वाघमारे, अनिल आठवले, अविनाश नरवाडे, प्यारेलाल भाऊ, भीमराव मनोहर  आदी सहभागी झाले होते.

  No comments

  Post Top Ad

  Post Bottom Ad