वॉर्ड क्रं. ३९ मधील डम्पिंग ग्राउंड व खराब रस्त्यांच्या समस्येबाबत अति. मुख्याधिकाऱ्यांची भेट
भारतीय जनता पार्टी अंबरनाथ शहराध्यक्ष अभिजीत गुलाबराव करंजुले पाटील यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी अंबरनाथ नगरपालिकेचे अतिरिक्त मुख्याधिकारी धीरज चव्हाण यांची भेट घेऊन वार्ड क्रमांक ३९ मधील "ज्वलंत प्रश्न बेकायदेशीर डम्पिंग ग्राउंड व ग्रीन सिटी चौक ते ज्येष्ठ नागरिक कट्टा व सदाशिव पुरम ते मोरीवली पाडा" या खराब रस्त्याच्या विषयी चर्चा करून निवेदन देण्यात आले. यावेळी समाजसेवक विश्वजीत करंजुले पाटील यांनी सांगितले की, सदरील कामांचा पाठपुरावा भारतीय जनता पार्टी शहराध्यक्ष अभिजित करंजुले पाटील हे करीत आहेत, परंतु निगरगट्ट प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत आहे. म्हणून परिसरातील रहिवाशांच्या समस्यांचे निराकरण होण्यासाठी समाजसेवक विश्वजीत करंजुले-पाटील हे स्वतः दिनांक ०५ फेब्रुवारी २०२१ रोजीपासून आमरण उपोषणास बसणार आहेत. यावेळी व्यापारी अध्यक्ष खानजी दल, सरचिटणीस दिलीप कणसे, माजी नगरसेवक रोहित महाडिक, भाजपा सचिव अजित खरात, मनिष गुंजाळ, रूपाली लठ्ठे, अप्पा कुलकर्णी आदी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
No comments