युनियन बँकेच्या वतीने ठाण्यातील पदपथांवरील विक्रेत्यांना क्यूआर कोडचे वितरण
युनियन बँक ऑफ इंडिया चे क्षेत्रीय कार्यालय मुंबई-ठाणे च्या वतीने सोमवार, 1 फेब्रुवारी 2021 रोजी युनियन बँक ऑफ इंडिया, गोकुळनगर शाखेच्या वतीने पदपथांवरील विक्रेत्यांना क्यू आर कोड वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी युनियन बँक ऑफ इंडिया चे महाप्रबंधक (मुंबई) वेंकटेश मुच्छल, क्षेत्रप्रमुख (मुंबई, ठाणे) रेणु के. नायर उपस्थित होते.
प्रधानमंत्री स्वनिधी ही योजना युनियन बँकेच्या वतीने डिजिटल या नावाने चालविली जात आहे. या योजनेंतर्गत पदपथांवरील विक्रेत्यांना अल्प व्याजदरात 10 हजार रुपयांचे नुकतेच कर्ज वितरण करण्यात आले आहे. फळविक्रेते, वडापाव, पाणीपुरी, भाजी विक्रेते अशा अनेक पदपथांवरील विक्रत्यांना व्यवहार डिजिटल करता यावा म्हणून ठाण्यातील सुमारे 250 पदपथावरील विक्रेत्यांना क्यूआर कोडचे वितरण सोमवारी करण्यात आले. या क्यूआर कोडच्या माध्यमातून विक्रेत्यांना डिजिटल व्यवहार करण्यास मदत होणार आहे.
ठाण्याप्रमाणेच भिवंडी व शहाड शाखेच्या वतीनेही अशाप्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
भारत सरकारच्या ज्या योजना आहेत, त्या युनियन बँकेच्या वतीने मोठ्या प्रमाणात राबविण्यात येतात आणि यापुढेही चालू राहणार आहेत. युनियन बँक ऑफ इंडिया चे महाप्रबंधक (मुंबई) वेंकटेश मुच्छल यावेळी म्हणाले की, सध्याच्या डिजिटलच्या युगात लहान लहान व्यापाऱयांना सुद्धा त्याचा उपयोग झाला पाहिजे हे लक्षात घेऊन युनियन बँकेच्या ठाणे शाखेच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते आणि यापुढेही बँकेच्या वतीने प्रयत्न करण्यात येतील.
क्षेत्रीय प्रमुख रेणू नायर म्हणाल्या की, बँकींग व्यवहार करतानाच समाजसेवा करणे हे युनियन बँकेचे लक्ष्य असून त्यातून अधिकाधिक लोकांपर्यंत बँकेमार्फत मिळणारे फायदे पोहचविता येतील. विशेषकरून मध्यम तथा त्या खालोखालच्या लोकांनाही याचा फायदा होईल.
No comments