ठाणे जिल्हा परिषद कृषि विभागाचे 'कृषी विकासाच्या योजना' या पुस्तकाचे प्रकाशन
ठाणे जिल्हा परिषदेचे कृषि,पशुसंवर्धन व दुग्धशाळा समिती सभापती संजय मंगल निमसे यांच्या संकल्पनेतून साकार झालेली जिल्हा परिषद कृषी विभागाची ''कृषी विकासाच्या योजना'' या पुस्तिकेचे प्रकाशन जिल्हा परिषद अध्यक्ष सुषमा सागर लोणे,जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष गोटीराम पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.रुपाली सातपुते, उप मुख्य कार्यकारी अधिकारी ( प्रशासन) अजिंक्य पवार व सर्व सन्मानीय सभापती, जिल्हा परिषद सदस्य आणि अधिकारी यांच्या उपस्थितीत सर्वसाधारण सभेत करण्यात आले.
या पुस्तिकेत केंद्र शासन पुरस्कृत योजना, राज्य शासन पुरस्कृत योजना आणि जिल्हा परिषद सेस योजना कोणत्या आहेत, या योजनांचा लाभ कसा घ्यावा, योजनांचा लाभ घेण्यासाठी पात्रतेचे निकष काय आहेत याबाबतची सविस्तर माहिती या पुस्तिकेत देण्यात आली आहे. नागरिकांना योजनांची अचूक माहिती या पुस्तकातून मिळण्यास मदत होणार आहे असे कृषि विकास अधिकारी श्रीधर काळे यांनी सांगितले.
No comments