Header Ads

 • ताजा खबरें

  शेतकरी, कामगार विरोधी कायदा रद्द करण्याकरिता अंबरनाथमध्ये काँग्रेस तर्फे स्वाक्षरी मोहीम

   


  अंबरनाथ(बदलापूर विकास मीडिया):-
              "केंद्र सरकारने संपूर्ण महाराष्ट्रात व देशात शेतकरी व कामगारांकरिता जो कायदा पारित केला असून तो शेतकरी व कामगारांच्या विरोधात आहे. आज देशभरात काँग्रेस तर्फे शेतकरी, कामगार बचाव रॅली काढण्यात आली असून आज अंबरनाथमध्येही शहर ब्लॉक काँग्रेस कमिटी तर्फे शहराध्यक्ष प्रदीप नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली "शेतकरी, कामगार बचाव लाईव्ह डिजीटल रॅली आणि शेतकरी व कामगार विरोधी कायदा मागे घेण्याकरिता स्वाक्षरी मोहीम" अंबरनाथ पूर्वेकडील छत्रपती शिवाजी महाराज चौक याठिकाणी आयोजित करण्यात आली होती. या स्वाक्षरी मोहिमेत केंद्र सरकारने शेतकरी व कामगारांच्या विरोधात जो कायदा पारित केला आहे त्याला रद्द करण्याकरिता अंबरनाथमधून सुमारे १० हजारापेक्षा जास्त नागरिकांनी स्वाक्षऱ्या केल्याची माहिती काँग्रेसचे अंबरनाथ शहराध्यक्ष प्रदीप नाना पाटील यांनी सांगितले.
               या आंदोलनात काँग्रेसचे अंबरनाथ शहराध्यक्ष प्रदीप नाना पाटील, माजी नगरसेवक उमेश पाटील, पंकज पाटील, सुरेंद्र यादव, चरण रसाळ, मागासवर्गीय सेल जिल्हाध्यक्ष सुमेध भवार,संघजा मेश्राम, स्मिता बंगेरा, हाजी सलीम चौधरी, रोहितकुमार प्रजापती, बिस्मिला शेख, सुभाष पाटील, फिरोज खान यांच्यासह अनेक मान्यवर, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने सहभागी झाले होते.
                काँग्रेसचे अंबरनाथ शहराध्यक्ष प्रदीप नाना पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, संपूर्ण देशात जो शेतकरी व कामगारांच्या विरोधातला कायदा आणलेला आहे. त्याच्या विरोधात संपूर्ण भारतामध्ये काँग्रेसने आंदोलन केलेलं आहे. संपूर्ण भारतातील शेतकरी व कामगारांच्या स्वाक्षऱ्या घेऊन त्याचे पत्र या केंद्र सरकारला पाठविणार आहे. हा जो कायदा केंद्र सरकारने पारित केलेला आहे, तो त्वरित रद्द करा", शेतकऱ्यांच्या व कामगारांच्या मुळावर उठलेला हा कायदा असून त्याचा विरोध म्हणून काँग्रेसचे नेते राहुल गांधी, सोनिया गांधी, प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, चव्हाण, प्रभारी एच. के. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आल्याचे प्रदीप पाटील यांनी सांगितले.

  No comments

  Post Top Ad

  Post Bottom Ad