Header Ads

 • ताजा खबरें

  जागतिक दृष्टीहीन दिनी दिव्यांगांनी केले‘अंध आंदोलन’

   


  ठाणे(बदलापूर विकास मीडिया):-

       दिव्यांगांना मंजूर करण्यात आलेली घरे अद्यापही वितरीत न केल्याच्या निषेधार्थ जागतिक दृष्टीहीन दिनाचे औचित्य साधून  विश्व दिव्यांग अत्याचार विरोधी मंचच्या वतीने  ठाणे महानगर पालिकेसमोर मोहम्मद युसूफ खान यांच्या नेतृत्वाखाली दिव्यांगांकडून ‘अंध आंदोलन’ छेडण्यात आले.

       ठाणे महानगर पालिका आणि राज्य सरकारच्या वतीने दिव्यांगांना मोफत घरे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या घरांचे वाटप तत्काळ करण्याचे धोरणही आखण्यात आले होते. त्यानुसार, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ठाण्याच्या काशीनाथ घाणेकर नाट्यगृहामध्ये आयोजित एका कार्यक्रमामध्ये दिव्यांगांना घरांच्या चाव्या देण्याचा सोपस्कार पार पाडण्यात आला होता. अर्थात हा कार्यक्रम म्हणजे केवळ दिखाव्यापुरताच असल्याचे स्पष्ट झालेे आहे.  या कार्यक्रमानंतरही दिव्यांगांना प्रत्यक्ष घरांचे वाटप करण्यात आलेले नाही. दाखविण्यासाठी हा कार्यक्रम करुन मुख्यमंत्र्यांची दिशाभूल आणि दिव्यांगांची फसवणूक करण्यात आल्याचा आरोप करीत  अखिल भारतीय दिव्यांग सेना विश्व दिव्यांग अत्याचार विरोधी मंच संचालित बृहन्महाराष्ट्र दिव्यांग विकास कामगार संघटनेच्या वतीने दिव्यांगांनी हातात सफेठ काठी आणि डोळ्यांना काळा गॉगल लावून आंदोलन केले.
       हे आंदोलन सुरु असतानाच पोलिसांनी मध्यस्थी करुन आंदोलनकर्त्यांना सह अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाड यांची भेट घेतली. अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे,  स्थावर मालमत्ता विभागाच्या उपायुक्त अश्विनी वाघमुळे यांना शिष्टमंडळाने निवेदन दिले. हेरवाड यांनी, कोरोना संपल्यानंतर हा प्रश्न तत्काळ मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. तर, लवकरात लवकर दिव्यांगांना हक्काचा निवारा न दिल्यास आपण तीव्र आंदोलन छेडू असा इशारा खान यांनी दिला.
      या आंदोलनात  नुरजहां मोहम्मद सुल्तान खान ,शबनम रैन, इक्बाल काजी,संजय दुधनाथ यादव, सुरेश यादव, अशोक  कुमार गुप्ता, लिंगप्पा कांबले, इस्माईल अंसारी,अल्लारखा नुर मोहम्मद सोरठिया,शोएब शेख, वकील अंसारी आदी दिव्यांग सहभागी झाले होते.

  No comments

  Post Top Ad

  Post Bottom Ad