Header Ads

 • ताजा खबरें

  भारतीय लोकांमध्‍ये व्हिटॅमिन डी ची कमतरता- डॉ. मनिष सोनटक्‍के

   


  वाशी येथील फोर्टिस सहयोगी हॉस्पिटल - हिरानंदानी हॉस्पिटलमधील सल्‍लागार, जॉइण्‍ट रिप्‍लेसमेंट सर्जन डॉ. मनिष सोनटक्‍के यांचा लेख


  कोरोनाविषाणू महामारीमुळे करण्‍यात आलेल्‍या लॉकडाऊन कारणास्‍तव जवळपास पाच महिन्‍यांपासून सर्व लोकांना घरातच राहावे लागले आहे. सूर्यप्रकाशाचा अभाव, तसेच मान्‍सून अशा कारणांमुळे त्‍यांच्‍यामधील जीवनसत्त्व ड चे प्रमाण कमी झाले आहे. असे निदर्शनास आले आहे की, ७५ टक्‍क्‍यांहून अधिक लोकांमध्‍ये जीवनसत्त्व ड ची कमतरता आढळून आली आहे. व्‍यक्‍तींना समस्‍या असो वा नसो, दरवर्षी जीवनसत्त्व-ड चा प्रमाणित डोस घेण्‍याचा सल्‍ला देण्‍यात आला आहे. एका आरोग्यसेवा प्रदात्याकडून करण्‍यात आलेल्‍या सखोल मूल्‍यांकनानंतर हे ठरवण्‍यात आले. 

  जीवनसत्त्व ड हे आवश्‍यक जीवनसत्त्व आहे, ज्‍याचे शरीरभरातील विविध लक्षणांवर असंख्‍य सकारात्‍मक परिणाम आहेत. इतर जीवनसत्त्वांच्‍या तुलनेत जीवनसत्त्व ड हार्मोनप्रमाणे कार्य करते आणि शरीरातील प्रत्‍येक पेशीला त्‍याची गरज आहे. जीवनसत्त्व ड काही मेदयुक्‍त मासे व फोर्टिफाईड दुग्‍ध उत्‍पादनांमध्‍येच विरळ प्रमाणात आढळून येते. फक्‍त आहारामधूनच ६०० ते ८०० आययूचे रेकमेण्‍डेड डेअली इनटेक (आरडीआय) मिळणे अत्‍यंत अवघड आहे.   

  जीवनसत्त्व ड कमतरतेची सामान्‍य चिन्‍हे व लक्षणे:

  -        रोगप्रतिकार शक्‍ती कमकुवत असल्‍याने वारंवार सामान्‍य सर्दी व फ्लूसह आजारी पडणे

  -        थकवा

  -        हाड दुखणे व स्‍नायुदुखी

  -        औदासिन्‍यता

  -        इम्‍पेअर्ड वाऊंड हिलिंग

  -        हाडांची झीज होणे व ओस्‍टेओपोरोसिस

  कोणत्‍या व्‍यक्‍तीने सिरम जीवनसत्त्व ड संदर्भात चाचणी करावी?

  -        हाडांमध्‍ये वेदना जाणवणारी, तसेच अत्‍यंत सुस्‍त व अस्‍वस्‍थ असलेली व्‍यक्‍ती

  -        पुरेसा सुर्यप्रकाश न मिळण्‍यासोबत घरीच असलेले वृद्ध व्‍यक्‍ती

  -        वाढ कमी झालेली तरूण मुले

  -        ओस्‍टेओपोरोसिस/ओस्‍टेओपेनियाने पीडित लठ्ठ व्‍यक्‍ती

  -        अत्‍यंत प्रदू्षित शहरांमधील व्‍यक्‍ती

  -        इरिटेबल बाऊल सिंड्रोम व क्रोहन्‍स डिसीज सारख्‍या मालाब्सॉर्प्शन सिंड्रोम्‍सने पीडित व्‍यक्‍ती

  निष्‍कर्ष - जीवनसत्त्व ड कमतरता ही सामान्‍य आहे आणि लक्षणे सूक्ष्‍म व न दिसून येणारी असल्‍यामुळे अनेक लोकांना ते जाणवत नाही. सुर्यप्रकाश हा जीवनसत्त्व ड मिळण्‍याचा सर्वोत्तम नैसर्गिक स्रोत आहे. प्रदूषणाचे कमी प्रमाण असलेल्‍या ठिकाणी सनस्क्रिनशिवाय सकाळी १० ते दुपारी ३ दरम्‍यान २० ते ३० मिनिटे सुर्यप्रकाशात राहणे रोजच्‍या आवश्‍यकतांची पूर्तता करण्‍यासाठी पुरेसे आहे.

   

  आहारामध्‍ये दोन मुख्‍य प्रकारचे जीवनसत्त्व ड आहेत:

  -        जीवनसत्त्व ड२ (एर्गोकॅल्सिफेरॉल), जे मशरूम्‍स सारख्‍या वनस्‍पती पदार्थांमध्‍ये आढळून येते.

  -        जीवनसत्त्व ड३ (कोलेकॅल्सिफेरॉल), जे साल्‍मन, कॉड व अंड्यातील पिवळा बलक यासारख्‍या पशुखाद्यांमध्‍ये आढळून येते.

  सध्‍याच्‍या मार्गदर्शकतत्त्वांनुसार ४०० ते ८०० आययू जीवनसत्त्व ड सेवन केल्‍याने सर्व आरोग्‍यदायी व्‍यक्‍तींच्‍या ९७ ते ९८ टक्‍के गरजांची पूर्तता होते. पण कमतरतेच्‍या संदर्भात सध्‍याच्‍या संशोधनानुसार असे निदर्शनास येते की, दररोज १००० ते ४००० आययू जीवनसत्त्व ड सेवन करणे आरोग्‍यदायी जीवनसत्त्व ड पातळ्यांपर्यंत पोहोचण्‍यासाठी बहुतांश व्‍यक्‍तींसाठी योग्‍य आहे.

  जीवनसत्त्व ड कमतरता असलेल्‍या व्‍यक्‍तींमध्‍ये रक्‍ताच्‍या पातळ्या ३० एनजी/मिलीपेक्षा कमी असतात. १२ एनजी/मिलीपेक्षा कमी प्रमाण गंभीर जीवनसत्त्व ड कमतरता मानले जाते. मुलांसाठी जीवनसत्त्व ड प्रीपरेशन्‍स पावडर्स, कॅप्‍सूल्‍स, चघळता येणारे टॅब्‍लेट्स व सिरपच्‍या रूपात सहजपणे उपलब्‍ध आहेत. प्रत्‍येक डोसमध्‍ये ६०००० आययू आहे, म्‍हणून प्रतिदिन १०००० आययूचे प्रमाण पाहता, हे प्रीपरेशन्‍स वर्षातून ८ ते १२ आठवड्यांतून एकदा घेता येऊ शकतात. हे डोस सुरक्षित आहेत आणि त्‍यांचे सर्व प्रौढ व्‍यक्‍ती आणि १० वर्षांवरील मुलांमध्‍ये कोणतेच दुष्‍परिणाम दिसून येत नाहीत. पण सप्‍लीमेन्टेशन सुरू करण्‍यापूर्वी स्‍थानिक डॉक्‍टरांचा सल्‍ला घेणे महत्त्वाचे आहे.

  प्राधिकरणाने सुरू केलेल्‍या अनेक मोहिमांनी सामान्‍य लोकांमधील या समस्‍येचे निराकरण करण्‍यासाठी जीवनसत्त्व ड फोर्टिफाईड पीठ, ज्‍यूसेस व दुग्‍ध उत्‍पादने सादर करण्‍यामध्‍ये मदत केली आहे. पण रूग्‍णांना जागरूक करणे, नियमित सेवनाचे पालन करणे आणि कमतरता व देखरेखीच्‍या उपचारादरम्‍यान दर ६ महिन्‍यांनी जीवनसत्त्व ड पातळ्यांची तपासणी करणे अशा महत्त्वपूर्ण गोष्‍टींकडे दुर्लक्ष करू नये.           

  No comments

  Post Top Ad

  Post Bottom Ad