Header Ads

 • ताजा खबरें

  कोव्हिड उपचारा दरम्यान ठाणे हेल्थ केअर हॉस्पिटलने केलेल्या रुग्णसेवेबद्दल रुग्णाने व्यक्त केली कृतज्ञता

   


  ठाणे(बदलापूर विकास मीडिया):-

      राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पोखरण भागाचे नगर संघचालक अनिरुद्ध केळकर काही दिवसांपूर्वी नौपाडा येथे असणाऱ्या ठाणे हेल्थ केअर हॉस्पिटलमध्ये कोव्हीडीमुळे उपचार घेत होते. या काळात हॉस्पिटल व्यवस्थापनाने त्यांची उत्तम सेवा केली. त्यामुळे ते लवकर बरे होऊ शकले. त्यांना या कालावधीत हॉस्पिटलच्या स्टाफच्या वतीने जी सेवा देण्यात आली त्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करत त्यांच्या तर्फे स्टाफसाठी बुधवारी न्याहारीची व्यवस्था करण्यात आली. त्यांनी कृतज्ञता पत्र देऊन हॉस्पिटल व्यवस्थापनाचे आभार मानले.
      अनिरुद्ध गजानन केळकर हे ६४ वर्षाचे गृहस्थ ठाण्याचे निवासी आहेत. दुर्दैवाने जुलै, ऑगस्ट दरम्यान त्यांना  COVID ची बाधा झाली. ते  ३१ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर दरम्यान हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते. 
          दरम्यान  हॉस्पिटल व्यवस्थापनाने त्यांना एक COVID पेशंट म्हणून अत्यंत आपुलकीची व प्रेमाची वागणूक दिली. सकाळ पासून रात्री पर्यंत सर्व प्रकारची काळजी व सेवाही अत्यंत उत्तम प्रतीची होती. व याच उपचारामुळे मी COVID मधून बरा झालो याची मला खात्री आहे. असे श्री. केळकर सांगतात.  

  No comments

  Post Top Ad

  Post Bottom Ad