Header Ads

 • ताजा खबरें

  माझे कुटुंब माझी जबाबदारी । शिवसेना शहरप्रमुख आणि नगरसेवक वामन म्हात्रे ह्यांच्याकडून जनतेला आवाहन

   


  बदलापूर(बदलापूर विकास मीडिया):-

  बदलापूर मधील दिवसेंदिवस वाढणारी कोरोना संख्या थांबवण्यासाठी कित्येक उपाययोजना केल्या गेल्या. कोरोना आजारासंबंधी जनजागृती करून  खबरदारी घेता यावी म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ह्यांनीसंपूर्ण महाराष्ट्रभर माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीम राबवली. आणि प्रत्येक तालुक्यात आणि जिल्ह्यातील स्थानिक प्रशासनाला निर्देश दिले. घरोघरी जाऊन प्रत्येकाची ऑक्सिजन टेस्ट आणि टेम्परेचर टेस्ट करणे तसेच लोकांनमध्ये जनजागृती करणे ह्यासाठी बदलापूर मध्ये माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेचा दुसरा टप्पा सुरु करण्यात आलेला आहे. 

      महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या मार्गदर्शना नुसार संपूर्ण राज्यभरात "माझे कुटुंब माझी जबाबदारी" हि मोहीम राबवली जात आहे. कुळगाव बदलापूर नगरपालिका क्षेत्रात राबवली जाणारी मोहीम हि देखील या राज्यव्यापी मोहिमेचा एक भाग आहे. बदलापूरकर नागरिकांसह सर्व लोकप्रतिनिधींच्या साहायाने व स्वयंसेवी संस्थाच्या सहभागाने राबविण्यात येणाऱ्या या मोहिमेत प्रभावी कोविड नियंत्रणासाठी नवीन जीवनशैली पद्धतीचा अवलंब करण्यास अधिकाधिक व्यक्तींना प्रेरित करणे हा या मोहिमेचा मुख्य भाग आहे. आज या मोहिमेचा व्दितीय टप्पा सुरु झाला असून प्रत्येक नागरिकांनी या मोहिमेत सहभाग घ्यावा व घरी तपासणी साठी येणाऱ्या सेविका व इतर कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे हि मी विनंती करतो. असे आवाहन शिवसेना शहर प्रमुख आणि नगरसेवक वामन म्हात्रे ह्यांनी लोकांना केलं. 


  No comments

  Post Top Ad

  Post Bottom Ad