Header Ads

 • ताजा खबरें

  कोरोना लॉकडाऊनच्या काळात बदलापूरात दोन घरफोड्या ; बदलापूर पोलिस शहर सुरक्षेत ठेवण्यास असमर्थ?

  जनतेने व व्यापार्यांनी नियम पाळले नाही तरी पोलिस देतात फटका आणि नियम पाळले तरी बसतोय आर्थिक फटका

  बदलापूर (बदलापूर विकास मिडिया)- कुळगांव बदलापूर शहर जे कोरोना लॉकडाऊनच्या काळात बंद अवस्थेत व जनता अडचणीत सापडली होती तेथे चोरांनी मात्र लॉकडाऊनचा फायदा घेत दोन दुकानात घरफोड्या करुन आपले हात साफ केले आहे. विशेष म्हणजे लॉकडाऊन असतांना तसेच रस्त्यावर पोलिसांची गस्ती असतांनाही घरफोड्या होत असल्याने बदलापूर पश्चिम आणि बदलापूर पूर्व पोलिस नेमकी पेट्रोलिंग करते की नाही असा संशय देखील बदलापूरकरांच्या मनात निर्माण होत आहे.

  बदलापूर पश्चिम बेलवली भागातील सुरज किरण अपार्टमेंट याठिकाणी दुकान नं. 8 येथे रेडीमेट कपड्याचे दुकान असुन दि. 30 जुलै ते दि. 1 ऑगस्ट दरम्यान मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटर तोडून एकुण 3 लाख रुपये किमतीचे जीन्स पॅन्ट, स्पोर्ट टिशर्ट, ट्रक पन्ट व इतर कपडे चोरल्याची घडली आहे. पहाटेच्या सुमारास एका रिक्षा चालकाने दुकानाचे शटर उचकटलेले पाहुन दुकान मालक अक्षय शेखर मोदी यांना माहिती दिली. त्याप्रमाणे मोदी यांनी दुकानाकडे धाव घेत दुकानाची अवस्था पाहुन घरफोडी झाल्याची लक्षात आल्याने बदलापूर पश्चिम पोलिस गाठले. 

  बदलापूर पश्चिम पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात भादवि कलम 380, 454, 457 अन्वये गुन्हा दाखल केला असुन चोरट्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

  कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव पसरु नये म्हणुन कुळगांव बदलापूर नगरपालिकेने एक दिवस बंद एक दिवस चालु असा नियम दुकानदारांसाठी ठेवले होते व अक्षय शेखर मोदी यांनी सदर नियम पाळत दि. 30 जुलै रोजी दुकान बंद केले. 

  तसेच बदलापूर पूर्व आपटे होम्स येथील रहिवाशी गोकुळ गोविंद गडकरी हे आपल्या पत्निसह मुळगावी गेले व भारतभर कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव असल्याने व लॉकडाऊन सुरु असल्याने त्याचठिकाणी अडकले व बदलापूरात परत घरी येऊ शकले नाही. लॉकडाऊनच्या या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी डाव साधला व गडकरींच्या घरात घरफोडी करत त्यांच्या घरातील मंगळसुत्र व इतर सोन्याचे दागिने चोरल्याचे समजते. दि. 23 जुलै रोजी शेजार्यांनी गडकरी यांचे घर उघड असल्याचे पाहुन त्यांना संपर्क केले असता 24 जुलै रोजी गडकरी यांनी घराची परिस्थिती पाहिल्यानंतर घरफोडी झाल्याचे लक्षात आल्याने त्यांनी बदलापूर पूर्व पोलिस ठाणे गाठत आपली फिर्याद नोंदविली. बदलापूर पूर्व पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात भादवि कलम 380, 454, 457 अन्वये गुन्हा दाखल केले.

  वैकल्पिक दिन दुकान नियमाचा फायदा तसेच लॉकडाऊनचा फायदा घेत चोरटे घडफोडी करत असल्याने कोरोना काळात व्यापारी मंडली नियम पाळुन सुद्धा तसेच नागरिक वर्ग लॉकडाऊनचा नियम पाळुन सुद्धा त्यांना मोठा फटका लागला आहे. नियम पाळले नाही तर पोलिस कारवाई करणार गुन्हा दाखल करणार आणि नियम पाळले तर चोरटे घरफोड्या करुन मोठा फटका बसवणार अश्या अवस्थेत बदलापूरचे दुकानदार व्यापारी वर्ग व जनता कोरोनाशी सामना करत आहेत. या व्यापार्यांचा तसेच पिडीत जनतेचा महाराष्ट्र शासनाने विचार केले पाहिजे असे पत्रकार महेश कामत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी केली आहे.

  जनता व व्यापारी जर महाराष्ट्र शासनाचे नियम पाळल्यानंतर सुद्धा महाराष्ट्र पोलिस खात्यातील पोलिस कर्मचारी शहर सुरक्षित ठेवण्यात असमर्थ ठरत असतील व त्याचा मोठा आर्थिक फटका नागरिकांना बसत असेल तर यात महाराष्ट्र पोलिस खातं आणि महाराष्ट्र सरकार मोठ्या प्रमाणात जबाबदार असल्याचे पत्रकार कामत यांचे म्हणणे आहे. अश्या पिडीतांना सरकारने नुकसान भरपाई दिली पाहिजे असेही पत्रकार कामत शेवटी  म्हणाले.

  No comments

  Post Top Ad

  Post Bottom Ad