Header Ads

 • ताजा खबरें

  राज्यस्तरीय अभंग गायन स्पर्धेत सौजस मोरे प्रथम

   ठाणे, दि. 19 ः ठाण्यातील बाल ढोलकीपटू तेजस मोरे याचा भाऊ सौजस मोरे यानेही आपल्या मोठ्या भावाचा संगिताचा वारसा जपत भजन, गायन स्पर्धेत नावलौकीक कमावले आहे. नुकतीच कणकवली येथून अनिरुद्ध शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई संचलित बाल शिवाजी इंग्लिश मिडियम स्कूल व कलाविष्कार आयोजित राज्यस्तरीय अभंग गायन ऑनलाईन स्पर्धा पार पडली. यामध्ये सौजस पुंडलिक मोरे याने 8 ते 11 वर्षे वयोगटात प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्याच्या या यशाचे सर्व स्तरातून कौतूक होत आहे.

  वडील पुंडलिक मोरे हे भजन, गायनात आघाडी असताना त्यांची दोन मुले तेजस मोरे व सौजस मोरे यांनीही अगदी बालवयातच लोक कला व संगीत क्षेत्रात आपला ठसा उमटविण्यास सुरूवात केली आहे. यापैकी तेजस मोरे यांनी सह्याद्री वाहिनी, एबीपी माझा वरील कार्यक्रमांंत आपल्या ढोलकीची थाप देवून सर्व रसिकांना मंत्रमुग्ध केले आहे. तेजसला दैनिक जनादेशचे संपादक कैलाश म्हापदी यांनी जनादेश गौरव पुरस्काराने यापूर्वीच गौरविले असताना आता त्याचा छोटा भाऊ सौजस मोरे यांनी भजन, किर्तन गायन संगीत क्षेत्रात वयाच्या 5 व्या वर्षापासूनच आपला ठसा उमटवण्यास सुरूवात केली आहे. नुकतीच कणकवली येथे बाल शिवाजी इंग्लिश मिडियम स्कुल व कलाविष्कार आयोजित भव्य राज्यस्तरीय ऑनलार्ईन अभंग गायन स्पर्धा संपन्न झाली. यामध्ये वय वर्षे 8 ते 11 मध्ये राज्यभरातून हजारो मुलांनी सहभाग घेतला. ठाण्यातून सौजन पुंडलिक मोरे याची संस्थेच्या सचिव सुलेखा राणे यांनी प्रथम विजेता म्हणून निवड झाल्याचे घोषित केले. सौजस सध्या गुरुवर्य संगीत अलंकार पं. बाळासाहेब वाईकर सर आणि महेश कंठे सर यांच्याकडे यांच्याकडे संगित शिक्षणाचे धडे घेत आहे.


  No comments

  Post Top Ad

  Post Bottom Ad