Header Ads

 • ताजा खबरें

  कोरोना लॉकडाऊनच्या काळात बदलापूरात तब्बल 22 दुकानदारांवर पोलिसांनी केली कारवाई

  बदलापूर (बदलापूर विकास मिडिया)- जगात व भारतात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाल्याने त्या व्हायरसला जागतिक महामारी म्हणुन घोषित करण्यात आले. भारतामध्ये कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्याकरीता महाराष्ट्र राज्य शासनाने विविध कठोर उपाययोजना राबविले व दि.  रोजीपासुन संपुर्ण महाराष्ट्रात लॉकडाऊन घोषित करण्यात आले.  त्या काळात बदलापूर पूर्व व पश्चिम विभागात सदर बंदी लागु असतांना सुद्धा मास्क न वापरता दुकानात खाद्यपदार्थ व इतर वस्तुंची विक्री करणे, सोशल डिस्टन्सिंगचा पालन न करणे तसेच आल्टरनेट दिवस दुकान उघडण्याचा पालिकेचा नियम असतांना त्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी तब्बल 22 दुकानदार मालकांविरोधात बदलापूर पूर्व व पश्चिम पोलिसांनी गुन्हा दाखल केले आहे.

  यामध्ये बदलापूर पश्चिम पोलिसांनी फक्त एका ढाब्यावर तर बदलापूर पश्चिम पोलिसांनी एकुण 21 ठिकाणी कारवाई केल्याचे समजते.

  बदलापूर पश्चिम पोलिसांनी दि. 2 ऑगस्ट रोजी पेट्रोलिंग करतांना सोनिवली गाव, बदलापूर पश्चिम याठिकाणी वसईकर ढाबा हे चालु असल्याचे तसेच सोशल डिस्टन्सिंगचा नियम पालत नसल्याचे तसेच मास्क न लावता खाद्यपदार्थ विक्री करत असल्याचे लक्षात आल्याने ढाबा मालक सुनिल माळु घावट व त्याचा मुलगा सुरज सुनिल घावट विरोधात भादवि कलम 188, 269, 270 व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 कलम 51 अन्वये गुन्हा दाखल केले आहे. 

  त्याचप्रमाणे बदलापूर पूर्व पोलिसांनी दि. 1 जुलै रोजी चिकन दुकान चालविणार्याने मास्क न लावता चिकन विकल्याप्रकरणी दिलीप सोमनाथ पवार, ए1 चिकन शॉपचा मालक आवेश अशपाक शेख या विरोधात कारवाई केली. तसेच 6 जुलै रोजी फरसाण विक्रेता शिवसागर काशी सरोज तसेच किराणा माल विक्री करणारा नारायण शांताराम चौधरी विरोधात मास्क न लावता खाद्य पदार्थ विक्रीत केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केले. दि. 7 जुलै रोजी कोरोना काळात फेब्रिकेशनचे दुकान उघडुन काम असल्याकारणाने सुर्यकांत परशुराम कारंडे विरोधात, इलेक्ट्रीक सामान विक्रीचे दुकान उघडुन तोंडाला मास्क न लावता सामान विक्री करत असल्याप्रकरणी ज्ञानदेव मारुती पालवे विरोधात, तोंडाला मास्क न लावता रस्त्यावर फळ विक्री करत असल्याप्रकरणी वसीम यासीम राईम विरोधात व शेंगदाणा विक्रेता अशोक कुमार सिताराम चव्हाण विरोधात  पोलिसांनी गुन्हा नोंदविला. तसेच 10 जुलै रोजी बदलापूर पूर्व श्रीजी दर्शन येथील ए1 किराणा दुकान, जय बालाजी किराणा दुकान मालक महाविर रामचंद्र शर्मा व शांतीलाल विमारामाजी जात विरोधात मास्क न लावता खाद्यपदार्थ विकल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आले. त्याचसोबत 11 जुलै रोजी कलम सुपर मार्केट किराणा दुकान मालक चुनिलाल गेमाजी चौधरी व कशिश किराणा दुकान मालक शिवकुमार लालबहादुर शर्मा विरोधात मास्म न लावता खाद्यपदार्थ विकल्याप्रकरणी गुन्हा दाखल केले. दि. 13 जुलै रोजी पायल कलेक्शन कपड्याचे दुकान विक्री करणार्या दुकान मालक ईश्वर नारायण गुर्जर, साबण विक्री करणार्या इम्राहन अहमद अमिर हुसेन सय्यम विरोधात मास्क न लावता सामान विकल्याप्रकरणी तसेच समसमान दिवस दुकान उघडण्याचा पालिकेचा निर्णय असतांनाही दुकान उघडे ठेवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आले. दि. 15 जुलै रोजी हार्डवेअर दुकानदार संग्राम भैरवसिंग सिंग विरोधात, दि. 19 जुलै रोजी फ्रेश चिकन सेंटर दुकान मालक समिर जावेद शेख विरोधात, दि. 22 जुलै रोजी फरसाण विक्री व जनरल स्टोअर दुकानदार टपु चेन्ना रेड्डी विरोधात, 30 जुलै रोजी पान तंबाखु विक्री करणार्या अमर रामचरण चौहान विरोधात तोंडाला मास्क न लावता साहित्य विक्री केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.

  कोरोना काळात जेथे बदलापूर पूर्व पोलिसांनी तब्बल 21 लोकांविरोधात नियम तोडल्याप्रकरणी गुन्हा दाखल केले तेथे बदलापूर पश्चिम पोलिसांनी फक्त एकाच ढाब्यावर कारवाई केल्याने कुठेतरी बदलापूर पश्चिम पोलिस कारवाई करण्याऐवजी सेटलमेंट करते की काय अशी शंका नागरिकांच्या मनात निर्माण झाली आहे. 

  कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावच्या तसेच लॉकडाऊनच्या काळात बदलापूर पश्चिम विभागात अनेक ठिकाणी नियमांचे उल्लंघन करुन अनेक व्यापारी व्यवसाय करत होते परंतु फक्त एकाच ढाब्याला टार्गेट केल्याने बदलापूर पश्चिम पोलिस कोरोना काळात काय करत होती असा प्रश्न देखील बदलापूर पश्चिम परिसरातील नागरिक विचारत आहेत. 

  No comments

  Post Top Ad

  Post Bottom Ad