Header Ads

 • ताजा खबरें

  घरच्या घरी गणपती विसर्जनाकरीता अंबरनाथमध्ये भाजपातर्फे "फिरता हौद"

  अंबरनाथ दि. १९ (बदलापूर विकास मिडिया)- भारतीय जनता पार्टी अंबरनाथ शहरातर्फे शहराध्यक्ष अभिजीत गुलाबराव करंजुले पाटील यांच्या सहकार्याने अंबरनाथमधील सर्व नागरिकांसाठी "श्री गणपती" विसर्जनासाठी एक आगळा-वेगळा उपक्रम घेऊन येत आहे. "विसर्जनाच्या वेळी होणारी गर्दी टाळावी,घरगूती गणेशमूर्तींचे विसर्जन शक्यतो आपल्या घरीच,आपल्या परिसरात,आपल्या दारीच व्हावे" यासाठी भाजपा अंबरनाथ शहर आपल्या सेवेत "फिरता हौद" घेऊन येत असल्याचे आवाहन करण्यात आले आहे. कोविड-१९ च्या काळात सर्वच गोष्टींवर बंधने आली आहेत. गणपती उत्सवाच्या काळात देखील घरगुती गणेशमूर्ती विसर्जन करण्याचा प्रमुख प्रश्न सर्वांना भेडसावत आहे. त्यासाठी भाजपातर्फे एक "फिरता हौद" गणेशमुर्ती विसर्जनासाठी प्रत्येक विभागात नागरिकांच्या मागणीनुसार उपलब्ध करून देण्यात येईल याची सर्व गणेश भक्तांनी नोंद घ्यावी. ज्यांना गणेश विसर्जनकरीता गणेश घाटावर जावयाचे आहे त्यांच्यासाठी मोफत वाहन सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल.

  तरी या संधीचा सर्वांनी लाभ घ्यावा अशी नम्र विनंती अंबरनाथ शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने करण्यात आली आहे. ही सुविधा फक्त घरगुती गणपती करिता उपलब्ध आहे. त्यासाठी दिलीप कणसे - 9860230566, राजेश नाडकर - 9323037723, राजेंद्र(आप्पा) कुलकर्णी - 7559242378,विश्वास निंबाळकर - 9004043237, श्रीकांत रेड्डी - 7788883000, मंगेश निकाळजे - 7387167301, चेतन पवार - 8624888093, संतोष शिंदे - 9323137213 आदींशी संपर्क साधावा. असेही आवाहन भाजपाच्या वतीने करण्यात आले आहे.


  No comments

  Post Top Ad

  Post Bottom Ad