Header Ads

 • ताजा खबरें

  नागरी संरक्षण पदविका आभ्याक्रमासाठी इच्छूकांनी अर्ज करण्याचे आवाहन

  ठाणे दि.19( जिमाका):नागरी संरक्षण प्रशिक्षण महाविद्यालय, मुंबई महाराष्ट्र शासन येथे नविन सुरु होणाऱ्या आपत्ती व्यवस्थापन पदविका अभ्यासक्रमासाठी, आपत्ती व्यवस्थापन पदवित्तर पदविका अभ्यासक्रम मुंबई विद्यापिठाच्या संलग्नतेने सप्टेंबर-2020 ते जून-2021 या कालावधीत सुरु करण्यात येत आहे.

  नागरी संरक्षण संघटना ही आप्ती प्रसंगी दुर्घटनास्थळी प्रथम प्रतिसाद देऊन नागरीकांना आवश्यक ती मदत व बचाव करण्याचे कार्य करते तसेच शांतता काळात सामान्य नागरीक शासकीय-निमशासकीय, खाजगी आस्थापना आणि उद्योगांमधील आस्थापना वरील अधिकारी / कर्मचारी यांना तसेच शाळा-कॉलेज मधील शिक्षक व विदयार्थांना आपत्ती व्यवस्थापनामध्ये प्रशिक्षित करते.आपत्ती व्यवस्थापन पाठ्यक्रम ( Post Graduate in Disaster Management )  12 महिने  सप्टेंबर, 2020 ते जून 2021 असा काळावधी आहे .

   या प्रवेशासाठी प्रती बॅच 20 प्रशिक्षणार्थी  क्षमता आहे. कोणत्याही शाखेतील पदवीधर ( 60% पेक्षा अधिक गुण आवश्यक ) नियमानुसार मागासवर्गीय राखीव, रु. 59,000/- + रु. 500/- ( प्रक्रिया शुल्क) आहे. सदर पदविका पाठयक्रमाचे शुल्क Commandant, civil defence staff College, Mumbai यांचे नावे धनाकर्षाद्वारे ( DD ) जमा करण्यात यावे.पाठयक्रमासाठी प्रवेश अर्ज व शुल्क दि. 07 सप्टेंबर 2020 पर्यंत जमा करण्यात यावे.प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य देण्यात येईल. सदर पदविका पाठयक्रमाचे प्रवेश अर्ज व माहिती पुस्तिका http://maharashtracdhg.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध आहे.

  सदर पदविका पाठयक्रमाचा प्रवेश अर्ज समादेशक, नागरी संरक्षण प्रशिक्षण महाविद्यालय, तळ मजला, जुनेसचिवालय, जोड इमारत, महात्मा गांधी मार्ग, फोर्ट, मुंबई - 400032. यांचे कार्यालयात विहित वेळेत जमा करावे.असे आवाहन  अधिक्षक,नागरी संरक्षण प्रशिक्षण  महाविद्यालय महाराष्ट्र शासन स्मिता शिंदे यांनी केले आहे.

  No comments

  Post Top Ad

  Post Bottom Ad