Header Ads

 • ताजा खबरें

  झाडांची कत्तल केल्याप्रकरणी कृष्णा इस्टेट बिल्डींगच्या पदाधिकारी विरोधात गुन्हा दाखल

   बदलापूर (बदलापूर विकास मिडिया)- बदलापूर पश्चिम हेंद्रेपाडा दुबे बाग येथील कृष्णा इस्टेट कॉम्प्लेक्स आवारातील झाडे तोडण्याचा प्रकार घडल्याने संबंधीत सोसायटीच्या पदाधिकारी विरोधात फौजदारी गुन्हा बदलापूर पश्चिम पोलिस ठाण्यात दाखल झाल्याचे समजते.

  दि. 25 मे 2020 रोजी सायंकाळी 5 च्या सुमारास कृष्णा इस्टेट कॉम्प्लेक्स आवारातील बी1 ते इ2 या पुर्व पश्चिम इमारतीच्या समोर उत्तर गक्षीण भितलगीतीची लहान मोठी अकरा झाडे विनापरवाना तोडण्याचे प्रकार सुरु असल्याची माहिती कु.ब.न.प. चे कर्मचारी विठ्ठल धर्मा ठाकरे यांनी मिळाली. ठाकरे हे कु.ब.न.प. हद्दीतील विनापरवाना झाडे तोडणार्यावर देखरेख करुन त्याचेवर गुन्हा नोंद करण्याचे काम करत असुन त्यांनी तातडीने टीमसह घटनास्थळी धाव घेतली. सदर ठिकाणी 6 झाडे गुलमोहर, 3 झाडे पामची, शेवगा व नारळची 1 अशी झाडे असुन त्याठिकाणी तोडलेल्या झाडाची फांदी व लाकडे सध्या सित्थीमध्ये त्याठिकाणी नसले तरी जमिनीलगतच्या अंतर्गत खोडाचे निरीक्षणावरुन झाडे तोडल्याचे निष्पन्न झाल्याने कुळगांव बदलापूर नगरपरिषदेकडून कोणतीही परवानगी न घेता नियमांचे उल्लंघन करुन झाडांची कत्तल करण्यात आल्याने प्रशासनाने सोसायटीला नोटीस बजावले. तसेच सोसायटी पदाधिकार्यांनी झाडे तोडल्याने मान्य केल्याने बदलापूर पश्चिम पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असुन बदलापूर पश्चिम पोलिसांनी भारतीय दंड संहिता कलम 34, महाराष्ट्र नागरी क्षेत्रे झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम 1975 कलम 20 व 21 अन्वये सोसायटीच्या अध्यक्ष आणि सचिव विरोधात फौजदारी गुन्हा दाखल केल्याचे समजते.

  पालिका प्रशासनाची परवानगी न घेता झाड तोडणे कायद्याने गुन्हा आहे परंतु बदलापूर शहरात हे गुन्हा अनेकदा सोसायटीतील पदाधिकारी व रहिवाशी नियम व कायदा पाहित असुन देखील करतात. यंदा फौजदारी गुन्हा दाखल झाल्याने संबंधीतांवर कडक कारवाई करण्याची मागणी पर्यावरण प्रेमींनी केल्याचे समजते.

  No comments

  Post Top Ad

  Post Bottom Ad