Header Ads

 • ताजा खबरें

  निष्क्रिय स्टार लाईटच्या कार्यालयास मनसेने ठोकले टाळे

  Ambernath: - Ambernath Municipality has handed over the maintenance and repair work of street lights in the city to a private company called Star Light. For the last two to three months, many street lights in the city have been turned off. Due to this and lockdown, the number of thieves has increased and this is causing inconvenience to the citizens, women and senior citizens while walking on the streets in the evening. Kunal Bhoir said that the office of "Inactive Star Light" at Vadavalli Market was locked and its key was given to Ambernath Municipal Council Chief Shridhar Patankar.
  अंबरनाथ:- अंबरनाथ नगरपालिकेने शहरातील रस्त्यावरील दिवा - बत्तीची देखभाल व दुरुस्तीची काम स्टार लाईट या खाजगी कंपनीला देण्यात आले आहे. मागील २ ते ३ महिन्यापासून  शहरातील बऱ्याच रस्त्यांवरील स्ट्रीट लाईट बंद आहेत. त्यामुळे व लॉकडाऊनमुळे चोरांचे प्रमाण वाढले असून नागरिकांना यामुळे संध्याकाळच्या वेळी रस्त्यावरून चालताना महिलावर्ग,ज्येष्ठ नागरिक यांना त्रास होत आहे.अंबरनाथ नगरपालिकेच्या नगरसेवकांनी,स्थानिक नागरिकांनी स्टार लाईटच्या कंत्राटदाराला वारंवार  तक्रार करून सुद्धा काम करत नव्हते, शेवटी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने अंबरनाथ शहराध्यक्ष कुणाल सुभाष भोईर यांनी "निष्क्रिय स्टार लाईटच्या" वडवली मार्केट मधील कार्यालयास कुलूप (टाळे) ठोकण्यात आले आणि त्याची किल्ली (चावी) अंबरनाथ नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्रीधर पाटणकर यांच्याकडे देण्यात आल्याचे कुणाल भोईर यांनी सांगितले.

  No comments

  Post Top Ad

  Post Bottom Ad