Header Ads

  • ताजा खबरें

    बदलापूरात कोरोनाच्या प्रसारावर नियंत्रणासाठी पोलिसांनी सर्वप्रथम स्थानिक राजकारण्यांना क्वारंटाईन करा

    Badlapur (Badlapur Vikas Media) - First one-two, ten, thirty, number thus. As of June 15, the number of corona victims has risen to 424. Even with the news of Corona's illness, the entire city of Badlapur is now in a state of panic. But even in such times, local political leaders seem to be greedy for publicity. Posting photos of meals and masks on social media and seeing their own Udo Udo may make such local leaders feel like they are God. Even the local politicians of Badlapur are not far behind in getting ridiculous publicity in a different language by giving a Corona Warrior Certificate to his house. Having been in the limelight for so many years, these politicians have become so intoxicated with publicity that even in the quarantine period, ordinary Badlapurkars are wondering if there is even a hint of humanity left in them. A few days ago, it was the birthday of two special leaders of Badlapur. Both of them are important leaders of Badlapur in their party. The lure of fame covers them somewhere. He organized a blood donation camp saying that there should be no shortage of blood during the time of Corona. Those who really want to donate blood can do so by going straight to the hospital or by donating blood in a small way by following all the hygienic things. But how will it get publicity, how will people go back and forth like Seth Dada? He was given the name of organizing a blood donation program by doing extravagant things. We are not against blood donation but even a small child understands the feeling behind it. What is special about it is that if one leader organizes it, then another gets hungry for fame. In the same way, another organizes a blood donation camp, spreads banners all over the city, posts photos of himself on social media and says let's fight from Corona and donate blood. In particular, the common man in Badlapur often wonders why the local politicians of Badlapur do not fall on their backs or on their backs in the same way that the ordinary citizens of Badlapur fall out of their houses or do not observe social discrimination. But the wise citizens of the city also know the fact that the stick of Badlapur police falls on the honest and the poor. The lockdown was lifted on the orders of Maharashtra Chief Minister Uddhav Thackeray, but social discrimination should still be observed in various districts and cities, but in Badlapur, due to the flamboyant nature of politicians and events, honest police are informing reporters on condition of anonymity. What is special is that these (some) honest policemen cannot do such politics because their bosses (senior police) are busy licking the palms of politicians. Seeing the increasing number of corona victims in Badlapur day by day, the Kulgaon Badlapur Municipal Council chief and the local police administration should unanimously ban local politicians for at least a month or two, so why not a blood donation camp. These politicians collect blood by placing different blood donors on the same bed or chair in the same way they hand out certificates without socks under the guise of blood donation camps or other camps, increasing the chances of contracting corona disease and spreading it. That is why the local police in Badlapur should immediately pass an order banning such programs, demanded journalist Mahesh Kamat on behalf of Badlapur Vikas Media to the Deputy Commissioner of Police, Ulhasnagar Circle 4. If the time comes, the local police should quarantine the local politicians who are hungry for this publicity. If they do, they should quarantine such leaders without thinking back, at least for as many days as the citizens will think about nature and life except politics. Ordinary citizens of Badlapur know that it is possible to do social work without going to the village, it is not necessary to distribute certificates to fight against corona, at least 2020, it is possible to live without celebrating birthdays, so why don't local politicians understand?
    बदलापूर (बदलापूर विकास मिडिया)-
    आधि एक-दोन, दहा, तीस, शंबर अश्या प्रकारे दि. 15 जुन पर्यंत कोरोना बाधितांची संख्या 424 वर गेली आहे. कोरोना आजाराच्या बातमीने सुद्धा आता संपुर्ण बदलापूर शहरातील नागरिक भयभीत आहेत. परंतु अश्या काळातही स्थानिक राजकिय नेते मात्र प्रसिद्धीसाठी हापापलेले दिसत आहेत. जेवण वाटतांनाचे फोटो, मास्क वाटतांनाचे फोटो सोशल मिडियावर पोस्ट करुन स्वतःचं उदो उदो होतांना पाहुन या अश्या स्थानिक नेत्यांना स्वतः देव असल्यासारखा कदाचित भास होत असेल. कोरोना बाधित बरा होऊन घरी आला की त्याच्या घरी जाऊन कोरोना योद्धा प्रमाणपत्र देऊन आगळा वेगला सरळ भाषेत फालतु प्रसिद्धी मिळण्यात बदलापूरचे स्थानिक राजकारणी सुद्दा मागे राहिलेले नाहीत. इतकी वर्ष प्रसिद्धीच्या झोक्यात खेळून हे राजकारणी एवढे प्रसिद्धीच्या नशेत चुर झाले आहेत कि क्वारंटाईन काळात सुद्धा स्वतःचे उदो उदो कसे करावे हे विचार करत असल्याचे पाहुन खरोखरच ह्यांच्यात माणुसकी तीळमात्र तरी उरलेली आहे का अशी शंका सामान्य बदलापूरकरांना मनात येत आहे.
    काही दिवसांपुर्वी बदलापूरच्या विशेष दोन नेत्यांचे वाढदिवस होते. दोघेही आप आपल्या पक्षातील बदलापूरचे महत्वाचे नेते. प्रसिद्धीची मोह त्यांना तरी कुठे आवरते. कोरोनाच्या काळात रक्ताचा तुटवडा पडू नये असे म्हणत रक्तदान शिबिराचे आयोजन केले. रक्तदान करण्याची ज्यांना खरोखरच इच्छा आहे हे सरळ सरळ रुग्णालयात जाऊन ही रक्तदान करु शकतात किंवा हायजीनिक सर्व गोष्टी पाळुन छोट्या प्रमाणात आयोजन करुन रक्तदान या उद्देशाने उपक्रम करु शकतात परंतु त्यात प्रसिद्धी कशा मिळणार, लोक शेठ दादा म्हणत मागे पुढे कसं फिरणार कदाचित याची काळजी घेत प्रमाणपत्र, सत्कार असल्या फालतु गोष्टी करुन त्याला रक्तदान महादान कार्यक्रमाचे आयोजन असे नाव देण्यात आले. आम्ही रक्तदानाच्या विरोधात नाही परंतु त्या मागची यांची भावना काय आहे हे एखाद्या लहान मुलाला सुद्धा सहाजिकच समजते. त्यात विशेष म्हणजे एका नेत्याने आयोजन केले मग दुसर्याला ही प्रसिद्धीची भुक लागतेच अश्या प्रकारे दुसरा ही रक्तदान शिबिराचे आयोजन करुन शहरभर बैनरबाजी, सोशल मिटियावर स्वतःचे फोटो पोस्ट करुन कोरोनापासुन लढुया चला रक्तदान करुया असे सांगत बदलापूरच्या क्वारंटाईनची पार ऐशी तैशी करण्यास कमी पडत नाही.
    विशेष म्हणजे ज्याप्रकारे बदलापूर शहरातील सामान्य नागरिक घराबाहेत पडला किंवा सोशल डिस्टंसिंग पाळत नसला तर ज्याप्रकारे त्याच्या पाठीवर पोलिसाची काठी पडते त्याप्रकारे बदलापूरच्या स्थानिक राजकारण्यांच्या पाठीवर किंवा ढुंगण्यावर काठी का पडत नाही असाही सामान्यांना अनेकदा प्रश्न पडत असावे. परंतु बदलापूर पोलिसांनी काठी ही प्रामाणिक आणि गरिबांवरच पडते हे सत्य देखील शहरातील सुज्ञ नागरिकांना माहितच आहे म्हणा.
    महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशावरुन लॉकडाऊन तर उठवण्यात आले परंतु सोशल डिस्टंसिंग आजही विविध जिल्ह्यात तसेच त्यातील शहरात गावात पाळले पाहिजे परंतु बदलापूर शहरात कुठेतरी राजकारण्यांच्या चमकोगिरी स्वभावामुळे व कार्यक्रमामुळे सोशल डिस्टंसिंगची ऐशी तैशी होत असल्याचे प्रामाणिक पोलिस आपले नाव न छापण्याच्या अटीवर पत्रकारांना माहिती देत आहेत. विशेष म्हणजे सदर (काही) प्रामाणिक पोलिस ही अश्या राजकारणांचे काही करु शकत नाही कारण त्यांचे आका (वरिष्ठ पोलिस) हे राजकारण्यांचे तळवे चाटण्यात व्यस्त असतात.
    बदलापूरात ज्याप्रकारे दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे ते पाहुन कुळगांव बदलापूर नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी आणि स्थानिक पोलिस प्रशासनाने एकमताने किमान एक दोन महिने तरी स्थानिक राजकारण्यांचे चमकोगिरीच्या कार्यक्रमावर पुर्णतः बंदी आणली पाहिजे मग ते रक्तदान शिबिरच का होईना. हे राजकारणी रक्तदान शिबिर किंवा इतर शिबिराच्या नावाखाली सोशल डिस्टंसिंग न पाळता ज्याप्रकारे सर्टिफिकेट हात मोजे न घातलेल्या हाताने देतात, त्याच त्याच बेड किंवा खुर्चीवर विविध रक्तदात्याला बसवुन रक्त संकलन करतात पासुन ते प्रि आणि पोस्ट सर्वच गोष्टीत कंटामिनेट होऊन कोरोना आजार लागण्याची तसेच पसरण्याची शक्यतेत वाढ करण्याचा सर्रास प्रकार करत आहेत, म्हणुनच बदलापूरच्या स्थानिक पोलिसांनी तातडीने अश्या कार्यक्रमांवर बंदी आणण्याचे आदेश पारित केले पाहिजे अशी मागणी बदलापूर विकास मिडियाच्या वतीने पत्रकार महेश कामत यांनी उल्हासनगर परिमंडळ 4चे पोलिस उपायुक्त यांच्याकडे केली आहे. वेळ पडली तर स्थानिक पोलिसांनी या प्रसिद्धीचे भुकेले स्थानिक राजकारण्यांना क्वारंटाईन करण्याची वेळ आली तर ते करतांनाही मागे पुढे विचार न करता अश्या नेत्यांना क्वारंटाईन केले पाहिजे किमान तितके दिवस तरी निसर्ग आणि जीवन याबद्दल नागरिक विचार करतील राजकारण विषय वगळता.
    गावगर्दी न करता ही समाजकार्य करता येते, कोरोनाशी लढण्यासाठी प्रमाणपत्र वाटपाची गरज असतेच असे नाही, किमान 2020 तरी वाढदिवस साजरा न करता ही जगता येते हे बदलापूरच्या सामान्य नागरिकांना कळते मग स्थानिक राजकारण्यांना का कळत नाही?    

    No comments

    Post Top Ad

    Post Bottom Ad