Header Ads

  • ताजा खबरें

    ठाणे कोव्हीड हॅास्पीटलचे मुख्यमंत्री ना. उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ई लोकार्पण


    Up-to-date hospital of 1024 beds admitted in the service of Thanekar from today  The Chief Minister testified that he was ready to fight against Corona  The battle against Corona is not to be fought fiercely. Statement of Eknath Shinde   Thane (17) Corona Covid-19 epidemic to be effectively dealt with and successful treatment of covid infected patients. Lokarpan today, Chief Minister of the state no. With the auspicious hand of Uddhav Balasaheb Thackeray, Minister of State for Urban Development and Guardian Minister of Thane District no. Eknath Shinde, Minister of State for Housing no. Dr. Jitendra Awhad, Mumbai Metropolitan Region Development Authority's Metropolitan Commissioner R. A. It was held in the presence of Rajiv and chaired by Mayor Naresh Ganpat Mhaske.       Speaking on this occasion, Chief Minister Na. According to Uddhav Thackeray, Maharashtra is a land of fighters. So we are not overwhelmed by the corona. Not wasted. He testified that he was ready to fight. He said that it is a matter of pride that we are building a battle level facility to face Corona Cavid and today everyone is working as a team.       Saying that there is a big difference between Corona's initial situation and today's situation, we had only two labs in the beginning, today we have 100 labs built. A few lakhs of beds have been made. Saying that it was Maharashtra that started the intensive care unit in the ground hospital, Chief Minister Na. Thackeray said that he now wants to wash his hands behind Corona's hands.       Initially, Mumbai Metropolitan Region Development Authority's Metropolitan Commissioner R. A. Rajiv informed about the Covid Hospital being set up at BKC Maidan. He also said that he has helped for Thane Kovid Hospital. After that Municipal Commissioner Vijay Singhal gave brief information about Thane Covid Hospital and the video of the hospital was shown.  Speaking on the occasion, State Urban Development Minister and Thane District Guardian Minister Na. Eknath Shinde has set up a well-equipped Covid Hospital in a record time of 24 days for which many developers have contributed. He thanked everyone for their help in setting up this well-equipped hospital without spending any money from the municipal coffers. Also through various Municipal Corporations, MMRDA, MMRC, CIDCO the Urban Development Department is making significant contribution in the fight against Corona. So as the Minister of this Department, I am proud of these things.  For the last three months we have been fighting a battle against Corona and in this battle we are all fighting regardless of life. If you don't want to waste it, you have to work hard. Shinde said.       The function was held at Saket Balkum. MP Rajan Vichare, Dr. Shrikant Shinde, MLA Ravindra Phatak, MLA Mangalprabhat Lodha, Deputy Mayor Mrs. Pallavi Pawan Kadam, Standing Committee Chairman Ram Repale, Police Commissioner Vivek Phansalkar, Municipal Commissioner Vijay Singhal, Sports and Cultural Committee Chairman Amar Patil, Shiv Sena group leader Dilip Bartakke, Majivada Manpada Ward Committee Chairman Mrs. Padma Bhagat, Special Officer Kovid-19 Ranjit Kumar, Dr. Pankaj Asia, Local Councilors Devram Bhoir, Sanjay Bhoir, Sou. Usha Bhoir, Bhushan Bhoir, Ramakant Madhavi, Deepak Vetkar, Corporator Mrs. Nisha Patil, Additional Commissioner (2) Sanjay Herwade, MCHI Thane President Ajay Ashar, Jitu Mehta, Raju Vora, Manish Khandelwal were present on the occasion.       With the help of Thane Municipal Corporation, Mumbai Metropolitan Region Development Authority and MCHI, Credai Thane Unit, Thane Covid-19 Hospital will be a great facility for Thanekars. The hospital has a total of 1024 beds and 500 beds are equipped with central oxygen. Of these, 76 beds are for ICU, 10 beds are for dialysis patients and 10 beds are for trauma patients.      On the ground floor of the building, 24 ICU beds, 10 beds are reserved for dialysis covid patients, 10 beds are reserved for bedridden. The second and third floors each have 26 ICU beds and 119 oxygen beds. There are 155 oxygen beds on the fourth floor. There are 155 simple beds available on the fifth and sixth floors.      The hospital has a total capacity of 1024 beds with 69 beds on the seventh floor, 67 beds on the eighth floor, 67 beds on the ninth floor and 22 beds on the tenth floor. An additional 300 beds can be constructed in the hospital if required. The hospital has 500 beds with oxygen facilities and is equipped with an uninterrupted supply of oxygen. The hospital also has a Covid Lab facility.     The hospital will provide free treatment to Kovid patients and will also have bhajans, patient uniforms, pathology lab, X-ray, corona testing lab and TV for entertainment as well as lockers.     Frame  The time should not come to use hospitals  You whole m
    1024 बेडसचे अद्ययावत रूग्णालय आजपासून ठाणेकरांच्या सेवेत दाखल

    कोरोनाच्या विरूद्ध लढण्यासाठी आपण सिद्ध असल्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही

    कोरोनाविरूद्धची लढाई कठोरपणे लढण्याची ना. एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन


    ठाणे (17) कोरोना कोव्हीड-19 महामारीचा प्रभावीपणे सामना करता यावा तसेच कोव्हीड बाधित रुग्णांवर यशस्वी उपचार करता यावे यासाठी एमएमआऱडीएच्यावतीने बीकेसी मैदानावर उभारण्यात आलेल्या दुसऱ्या टप्प्यातील कोव्हीड रूग्णालयाचा हस्तांतरण सोहळा तसेच बाळकुम-साकेत येथे १०२४ बेडसचे तळ अधिक १० मजल्यांचे सर्व सुविधांनीयुक्त ठाणे कोव्हीड रुग्णालयाचे ई लोकार्पण आज राज्याचे मुख्यमंत्री ना. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शुभहस्ते, राज्याचे नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालक मंत्री ना. एकनाथ शिंदे, राज्याचे गृहनिर्माण मंत्री ना. डॅा. जितेंद्र आव्हाड, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणचे महानगर आयुक्त आर. ए. राजीव यांच्या उपस्थितीत आणि महापौर नरेश गणपत म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले.

         यावेळी बोलताना मुख्यमंत्री ना. उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र ही लढवय्यांची भूमी आहे. त्यामुळे आम्ही कोरोनामुळे डगमगून गेलेलो नाही. खचलेलो नाही. तर लढण्यासाठी सज्ज आहोत अशी ग्वाही दिली. आपण कोरोना कव्हीडचा सामना करण्यासाठी युद्ध पातळीवर सुविधा निर्माण करण्यात येत असून आज प्रत्येक जण एक टीम म्हणून काम करीत आहोत ही अभिमानाची बाब आहे असे सांगितले.

         कोरोनाची सुरूवातीची परिस्थिती आणि आजची परिस्थिती यामध्ये खूप फरक आहे असे सांगून सुरूवातील आपल्याकडे केवळ दोनच लॅब होत्या आज आपल्याकडे 100 लॅबस निर्माण करण्यात आल्या आहेत. काही लाखांत बेडस तयार करण्यात आले आहेत. मैदानावरील रूग्णालयामध्ये अतिदक्षता विभाग सुरू करण्याची किमया महाराष्ट्रानेच केली असे सांगून मुख्यमंत्री ना. ठाकरे यांनी आता यापुढे करोनाच्या मागे हात धुवून लागायचे आहे असे सांगितले.

         प्रारंभी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणचे महानगर आयुक्त आर. ए. राजीव यांनी बीकेसी मैदानामध्ये उभा करण्यात आलेल्या कोव्हीड रूग्णालयाविषयी माहिती दिली. तसेच ठाणे कोव्हीड रूग्णालयासाठीही मदत केल्याचे सांगितले. त्यानंतर ठाणे कोव्हीड रूग्णालयाविषयी महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी थोडक्यात माहिती दिल्यानंतर रूग्णालयाची चित्रफीत दाखविण्यात आली.

    या समारंभात बोलताना राज्याचे नगर विकास मंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी 24 दिवसांच्या विक्रमी वेळेत सर्व सुविधांनीयुक्त कोव्हीड रूग्णालय उभा करण्यात आले असून यासाठी अनेक विकासकांनी यामध्ये आपले योगदान दिले आहे. महापालिकेच्या तिजोरीतून एकही पैसा खर्च न करता हे सुसज्ज असे रूग्णालय उभे करण्यासाठी मदत केल्याबदंदल त्यांनी सर्वांचे मनापासून आभार मानले. तसेच विविध महापालिका, एमएमआरडीए, एमएमआरसी, सिडको यांच्या माध्यमातून नगर विकास विभाग कोरोना विरोधातील लढाईत महत्वाचे योगदान देत आहे. त्यामुळे या खात्याचा मंत्री म्हणून या गोष्टींचा मला अभिमान आहे असे सांगितले.

    गेले तीन महिने आपण कोरोनाविरूद्धची लढाई लढत असून या लढाईमध्ये आपण सर्वचजण जीवाची पर्वा न करता लढत आहेत. ही मेहनत वाया जाऊ द्यायची नसेल तर आपल्याला कठोर मेहनत करावी लागणार आहे असे ना. शिंदे यांनी सांगितले.

         साकेत बाळकूम येथे संपन्न झालेल्या या समारंभाला खासदार सर्वश्री राजन विचारे, डॅा. श्रीकांत शिंदे, आमदार रविंद्र फाटक, आमदार मंगलप्रभात लोढा, उपमहापौर सौ. पल्लवी पवन कदम, स्थायी समिती सभापती राम रेपाळे, पोलिस आयुक्त विवेक फणसळकर, महापालिका आयुक्त विजय सिंघल, क्रीडा व सांस्कृतिक समिती सभापती अमर पाटील, शिवसेना गटनेते दिलीप बारटक्के, माजिवडा मानपाडा प्रभाग समिती अध्यक्षा सौ. पदमा भगत, विशेष अधिकारी कोव्हीड-19 रंजीत कुमार, डॅा. पंकज आशिया, स्थानिक नगरसेवक देवराम भोईर, संजय भोईर, सौ. उषा भोईर, भूषण भोईर, रमाकांत मढवी, दिपक वेतकर, नगरसेविका सौ. निशा पाटील, अतिरिक्त आयुक्त(2) संजय हेरवाडे, एमसीएचआय ठाणेचे अध्यक्ष अजय आशर, जितू मेहता, राजू वोरा, मनिष खंडेलवाल आदी मान्यवर उपस्थित होते.

         ठाणे महानगरपालिका, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि एमसीएचआय, क्रेडाई ठाणे युनिट यांच्या संयुक्त विद्यमाने सर्व सुविधांनीयुक्त असे हे ठाणे कोव्हीड-19 हॉस्पीटल ठाणेकरांसाठी मोठी सुविधा ठरणार आहे. या रूग्णालयामध्ये एकूण १०२४ बेडस असून ५०० बेडस हे सेंट्रल आॅक्सीजनची सुविधा असलेले आहेत. यातील ७६ बेडस हे आयसीयूचे असून १० बेडस डायलेसीस रूग्णांसाठी तर १० बेडस ट्राएजसाठी ठेवण्यात आलेले आहेत.
         या इमारतीच्या तळ मजल्यावर 24 आयसीयू बेडस्, 10 बेडस् डायलेसिस कोव्हीड रुग्णांसाठी, 10 बेडस् ट्राएजसाठी आरक्षित ठेवण्यात आले आहेत. दुस-या आणि तिस-या मजल्यावर प्रत्येक 26 आयसीयू बेडस् आणि 119 ऑक्सीजनचे बेडस् आहेत. तर चौथ्या मजल्यावर 155 ऑक्सीजनचे बेडस् आहेत. पाचव्या आणि सहाव्या मजल्यावर प्रत्येकी 155 साधे बेडस् उपलब्ध आहेत.
         या इमारतीच्या सातव्या मजल्यावर 69, आठव्या मजल्यावर 67, नवव्या मजल्यावर 67 बेडस् आणि दहाव्या मजल्यावर 22 बेडस् असे एकूण 1024 बेडसची क्षमता या रुग्णालयामध्ये आहे. आवश्यकता वाटल्यास या रग्णालयामध्ये अतिरिक्त 300 बेडस् निर्माण करता येऊ शकतात. या रुग्णालयामध्ये 500 बेडस् हे ऑक्सीजनची सुविधा असलेले बेडस् असून त्याला अखंडीतपणे ऑक्सीजनचा पुरवठा होईल अशी सुविधा निर्माण करण्यात आली आहे. रुग्णालयामध्ये कोव्हीड लॅबचीही सुविधा निर्माण करण्यात आली आहे.
        विशेष म्हणजे या ठिकाणी कोव्हीड रूग्णांवर मोफत उपचार करण्यात येणार असून भाजन, रूग्णांना युनिफार्म, पॅथालाजी लॅब, एक्स रे, कोरोना टेस्टींग लॅब आणि मनोरंजनासाठी टी व्ही तसेच लाकर्सचीही सुविधाही आहे.अतिशय निसर्गरम्य परिसरात उभारण्यात आलेले हे रूग्णालय रूग्णांसाठीही योग्य ठरणार आहे.

     

    चौकट

    रूग्णालये वापरण्याची वेळ येवू नये…

    आपण संपूर्ण महाराष्ट्रात युद्ध पातळीवर मोठ्या प्रमाणात आरोग्य सुविधा निर्माण करीत असून या सुविधा वापरण्याची वेळ कोणावरही येवू नये अशी प्रार्थना मी करतो असे भावपूर्ण उद्गारही मुख्यमंत्री यांनी या कार्यक्रमाच्या निमित्ताने काढले. त्याचप्रमाणे कोरोनाविरूद्ध आपण जी काही उपाययोजना करीत आहोत ती खूप पुढारलेली असून त्याबाबतीत आपण जगालाही मागे टाकले आहे असेही स्पष्ट केले.

     

    चौकट

    व्हिडीओ कान्फरन्सिंगच्या माध्यमातून लोकार्पण

    कोरोना कोव्हीड 19 च्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सींगचे पालन करताना राज्याचे मुख्यमंत्री ना. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी व्हिडीओ कान्फरन्सिंगच्या माध्यमातून बीकेसी येथे एमएमआरडीएच्या माध्यमातून दुसऱ्या टप्प्यातील कोव्हीड रूग्णालयाचे हस्तांतरण आणि ठाणे कोव्हीड रूग्णालयाचे लोकार्पण केले. यामध्ये मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त आय. एस. चहल, डॅा. तात्याराव लहाने हेही सहभागी झाले होते.

    No comments

    Post Top Ad

    Post Bottom Ad