Header Ads

 • ताजा खबरें

  बदलापूर भाजपा गटनेते राजेंद्र घोरपडे यांची वयोवृद्ध महिलेस शिवीगाळ

  कुळगांव बदलापूर विकास आघाडीचे देवेंद्र काळे यांनी केली पोलिस ठाण्यात लेखी तक्रार 
  Badlapur (Badlapur Vikas Media) - Aware citizens are now raising their voices in various quarters against the mismanagement of Kulgaon Badlapur Municipal Council, which is responsible for 80 per cent corruption and 20 per cent spit work in most of the public development works. However, the BJP's Badlapur group leader, former mayor and senior councilor Rajendra Pandharinath Ghorpade recently gave an example of how politicians are not tolerated if the civic ears are awakened and the administration is misled by political leaders. When the residents of their ward raised their voices regarding various problems in the ward, especially the inactive work of the underground sewerage scheme, sewage and other problems. Ghorpade was outraged when he told the newly appointed chief minister of Pujari. They started using the language of Are Ture directly to the locals. It is noteworthy that Devendra (Pappu) Kale, President of Kulgaon Badlapur Vikas Aghadi was also present there. Rajendra Ghorpade also insulted him and insulted his mother. This new face of senior corporator Rajendra Ghorpade was seen by the locals in Anjali Nagar area. Due to the administrative regime. On June 2, at 12.30 pm, the newly elected Chief Minister of Kulgaon Badlapur Municipal Council, Pujari, visited the Anjali Nagar area to inspect the development work in the Anjali Nagar area and to know the problems of the citizens. At that time, the citizens of the area, especially the women, raised their issues and explained to the chief minister how the work of inactive underground sewers has caused the citizens to face sewage and other problems frequently and the present corporator does not pay any attention to the area. After Rajendra Ghorpade understood this information, he Rajendra Ghorpade's ego was hurt when he met the residents of Anjalinagar area on June 4 and asked them what they would do if the people ignored Rajendra Ghorpade. This led to a verbal clash between the corporator Ghorpade and the residents of Anjalinagar area. Ghorpade started abusing him directly. He was so angry that he did not even realize that many women were present and started swearing in the name of his mother and sister. He also said that the women present were surprised at Rajendra Ghorpade's behavior as he uttered obscene words about Devendra Kale's 84-year-old Matoshri social worker. Devendra Kale, Bharat Karande and women of Anjali Nagar Sanstha have lodged a written complaint against Rajendra Ghorpade at Badlapur West Police Station and demanded immediate action against Rajendra Ghorpade for using wrong and obscene words about the woman. . He also said in the complaint that Rajendra Ghorpade had threatened him in an argument and verbal confrontation. "I will play your game. You are a cheater. It is written in the reply that he is accused of scam. Also, Rajendra Ghorpade was planning to kill Devendra Kale at that place. It is understood that Kale told the police that he came with 6313. Knowing the reaction of Rajendra Ghorpade in this regard, he told Badlapur Vikas that,
  बदलापूर (बदलापूर विकास मिडिया)- बहुतेक लोकविकासाच्या कामात 80 टक्के भ्रष्टाचार व 20 टक्के थुकपट्टीचे काम करणारी कुळगांव बदलापूर नगरपरिषदेच्या भोंगळ कारभाराविरोधात आता विविध प्रभागात जागृक नागरिक आवाज उठवत आहेत. परंतु नागरिकांनी जागृक झालेले व प्रशासनाला - राजकिय नेत्यांना चुक दाखवुन दिले तर ते राजकारण्यांना सहन होत नाही याचे नुकताच उदाहरण भारतीय जनता पक्षाचे बदलापूर गटनेते, माजी नगराध्यक्ष व ज्येष्ठ नगरसेवक राजेंद्र पंढरीनाथ घोरपडे यांच्या वागणुकीमुळे समजते. त्यांच्या प्रभागातील रहिवाश्यांनी जेव्हा प्रभागातील विविध समस्या विशेष करुन भुयारी गटार योजनेच्या निष्क्रीय कामामुळे सांडपाणी व इतर समस्येबाबत आवाज उठवत कु.ब.न.प. चे नवनियुक्त मुख्याधिकारी पुजारी यांना सांगितले असता घोरपडे यांना राग अनावर झाला. त्यांनी थेट स्थानिक रहिवाश्यांनाच अरे तुरे ची भाषा वापरण्यास सुरुवात केली. विशेष म्हणजे त्याठिकाणी कुळगांव बदलापूर विकास आघाडीचे अध्यक्ष देवेंद्र (पप्पू) काळे हे देखील उपस्थित होते त्यांना सुद्धा राजेंद्र घोरपडे यांनी शिवीगाळी केली तसेच त्यांचे मातोश्रींबद्दल अपशब्द उदगारल्याने ज्येष्ठ नगरसेवक राजेंद्र घोरपडे यांचा हा नविन चेहरा अंजली नगर परिसरातील स्थानिक रहिवाश्यांना पहायला मिळाले.
  प्रशासकीय राजवटीमुळे दि. 2 जुन रोजी दुपारी 12.30 च्या दरम्यान कुळगांव बदलापूर नगरपरिषदेचे नवनिर्वाचित मुख्याधिकारी पुजारी यांनी अंजली नगर परिसरात विकास कार्याची पाहणी, तसेच नागरिकांची समस्या जाणुन घेण्यासाठी अंजलीनगर परिसरात त्यांनी भेट दिली. त्याठिकाणी परिसरातील नागरिकांनी खास करुन महिलांनी आपली समस्या मांडत कशाप्रकारे निष्क्रीय भुयारी गटाराचे काम झाल्याने सांडपाणी व इतर समस्यांना वारंवार नागरिकांना सामोरे जावे लागते तसेच वर्तमान नगरसेवक आजिबात यापरिसरात लक्ष देत नाही हे सर्व मुख्याधिकारींना सांगु लागले. ही माहिती राजेंद्र घोरपडे यांना समजल्यानंतर त्यांनी दि. 4 जुन रोजी अंजलीनगर परिसरातील रहिवाश्यांशी भेट घेतली असता अनेकदा लोकप्रतिनिधीने आश्वासन देऊन देखील काम होत नाही म्हणुन लोकप्रतिनिधींचा कंटाळा आल्याने नागरिकांनी राजेंद्र घोरपडे यांना दुर्लक्षित करुन मुख्याधिकारी करतील काय करायचं ते असं सांगितल्यानंतर राजेंद्र घोरपडे यांचा इगो हर्ट झाला. ज्यामुळे नगरसेवक घोरपडे आणि अंजलीनगर परिसरातील रहिवाश्यांमध्ये शाब्दीक चकमक झाली. घोरपडे त्यांनी थेट शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यांना राग इतका अनावर होत होता कि त्याठिकाणी अनेक महिला उपस्थित आहेत याचा देखील त्यांनी भान राहिले नाही व त्यांनी आई-बहिणीच्या नावाने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तसेच देवेंद्र काळे यांच्या 84 वर्षीय मातोश्री समाजसेविकेबद्दल अश्लील शब्द उदगारल्याने उपस्थित महिलांनी राजेंद्र घोरपडे यांच्या वागणुकीवर आश्चर्य व्यक्त करत पहिल्यांदाच घोरपडे यांचा दुसरा चेहरा पाहिल्याचे त्यांनी सांगितले.
  याबाबत कु.ब.वि.आघाडीचे अध्यक्ष देवेंद्र काळे, भरत कारांडे व अंजली नगर संस्थेच्या महिलांनी बदलापूर पश्चिम पोलिस ठाण्यात राजेंद्र घोरपडे विरोधात लेखी तक्रार अर्ज दिले असुन महिलेविषयी चुकीचे व अश्लील शब्द वापरणार्या राजेंद्र घोरपडे यांच्यावर तातडीने गुन्हा दाखल करावा अशी मागणी लेखी अर्जाद्वारे केली आहे.
  बाचाबाची आणि शाब्दीक चक्मकीत राजेंद्र घोरपडे यांनी धमकी दिल्याचेही त्यांनी तक्रारीत म्हटेल असुन "मी तुझा गेम करेन, तु चिटर आहेस, तुला बघुन घेतो. असी धमकी दिली त्यावेळी काळे यांनी सुद्धा घोरपडे यांचा उद्देशून "तु टी.डी.आर. घोटाळ्याचा आरोपी आहे असे बोलल्याचे जबाबात लिहले आहे. तसेच राजेंद्र घोरपडे हे देवेंद्र काळे यांना मारहाण्याच्या उद्देशाने त्याठिकाणी प्लॅनिंग करुन गाडी क्र. 6313 ने आल्याचे ही काळे यांनी पोलिसांना सांगितल्याचे समजते.
  याबाबत राजेंद्र घोरपडे यांची प्रतिक्रिया जाणुन घेतले असता त्यांनी बदलापूर विकासला सांगितले कि, दुसर्या वार्डाची समस्या दाखवुन मला विनाकारण बदनाम करण्याचे षडयंत्र सुरु आहे. नवनविन चेहरे जे 5 वर्ष नागरिक कोण हे सुद्धा ज्यांना माहित नव्हते आता ते राजकारणात नगरसेवक होण्यासाठी म्हणुन वर्तमान लोकप्रतिनिधींना बदनाम करण्यासाठी अश्या प्रकारे लोकांना भडकवुन देण्याचे काम करत आहेत. 

  No comments

  Post Top Ad

  Post Bottom Ad