Header Ads

 • ताजा खबरें

  अफवा तसेच जनतेची दिशाभूल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

  Thane - A person has been booked at Narpoli police station in Bhiwandi in Thane district for spreading rumors and misleading the public over the corona virus spreading across the globe. This is the first crime in the district to be filed for spreading rumors about a serious illness. Deputy Commissioner of Police Rajkumar Shinde and his team have taken action on the complaint of Balsaheb Sergerao Davkhar, Medical Officer, Kharbav Primary Health Center, Bhiwandi. Owners of Arihant Matresses In a Gujarati daily newspaper on March 13, "arihant mattress will sleep on ANTI-CORONA VIRUS Mattress India to grow India CORONA RESISTANCE MATTRESS (6ft x 6ft x 5in) Rs 15000 / - Visit our Sleep Gallery @ Wooden 'Za Furniture Kasheli (Furniture Market) This ad was advertised under the heading Bhiwandi.  The Matars published a misleading advertisement in the public realizing that the corona virus would be prevented. Also, matrices Woodenza furniture, decorative, bhiwandi and building no. C-15, Gala No. 101, 102, Parasnath Complex, Valparada, Dapoda Road, Post Anjur, Ta Bhiwandi, Dist. Thane is available for sale here, as well as spreading rumors about it by falsely claiming that the corona virus will be prevented.  Police have also filed a further investigation against the owner under Narpoli Police Thane under section 3,4,5 of the Drug and Drug Treatment (Offensive Public Prosecutions) Act, 1954, with Disaster Management Act section 52 with section 505 (2). General Chat Chat Lounge
  ठाणे- जगभरात थैमान घालणाऱ्या करोना विषाणूसंदर्भात अफवा पसरवल्याप्रकरणी तसेच जनतेची दिशाभूल केल्याप्रकरणी ठाणे जिल्ह्यामध्ये भिवंडी येथील नारपोली पोलीस ठाणे येथे  एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
  गंभीर आजाराबाबत अफवा पसरवल्याप्रकरणी दाखल करण्यात आलेला हा जिल्ह्यातील पहिलाच गुन्हा आहे. पोलीस उपायुक्त पोलीस राजकुमार शिंदे आणि त्यांच्या पथकाने बाळसाहेब सर्जेराव डावखर, वैद्यकीय अधिकारी, खारबाव प्राथमिक आरोग्य केंद्र, भिवंडी यांच्या तक्रारीवरुन सदर  कारवाई केली आहे.
  अरिहंत मॅट्रेसेस चे मालकांनी दि. 13 मार्च रोजी एका गुजराथी दैनिक वृत्तपत्रात ‘‘ arihant mattress ANTI-CORONA VIRUS Mattress पे सोएगा इंडिया तो बढेगा इंडिया CORONA RESISTANCE MATTRESS (6ft x 6ft x 5in) Rs 15000/- Visit our Sleep Gallery @ Wooden' Za Furniture Kasheli ( Furniture Market) Bhiwandi  या मथळयाखाली  जाहिरात दिली होती.
   या  मॅटरेसमुळे कोरोना विषाणूला प्रतिबंध होईल असे जनतेच्या मनामध्ये समजूत करून जनतेची दिशाभूल करणारी जाहीरात प्रसिध्द केली. तसेच सदर  मॅट्रेस वुडनझा फर्निचर, कशेळी, भिवंडी व बिल्डींग क्र. सी-15, गाळा क्र 101, 102, पारसनाथ कॉम्पलेक्स, वळपाडा, दापोडा रोड, पोस्ट अंजुर, ता भिवंडी, जि. ठाणे येथे विक्री करीता उपलब्ध आहेत, तसेच त्याव्दारे त्यांनी कोरोना विषाणूला प्रतिबंध होर्इल असा खोटा दावा करुन जनतेमध्ये त्याबाबत अफवा पसरविली.
   सदर मालकाविरुद्ध नारपोली पोलीस ठाणे येथे गुरक्र 166 भादवि कलम 505(2) सह आपत्ती व्यवस्थापन कायद कलम 52 सह औषधीद्रव्य व तिलस्मी उपचार (आक्षेपार्ह जाहीराती) अधिनियम 1954 कलम 3,4,5 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा पुढील तपास पोउपनि भाट करीत आहेत.

  No comments

  Post Top Ad

  Post Bottom Ad