Header Ads

 • ताजा खबरें

  परदेश प्रवास करून येणाऱ्या व्यक्तींनी होम कोरोन्टाईन पाळावे -- जिल्हाधिकारी

  Thane: - District citizens Rajesh Narvekar has appealed that citizens coming to the district from abroad should take home quarantine for 14 days and stay safe in the house. Collector Narvekar said that as per the directive of the state government, the passengers arriving at the airport are being divided into three categories. Being divided into types A, B and C. The direct symptoms of A are in the traveler, the elderly passengers in B, and those with no symptoms are in the C category. Passengers in A and B are being tested and treated. In the meantime, the quintessential C-type passengers are being tested and sealed and called home quarantine. People who are being quarantined at home are being stamped with ink in the same way that they are applied after the election. It is mentioned how long home quarantine is going to be on hand sealing. These citizens should avoid leaving the house by the deadline. The district administration should be contacted immediately if any medical problems or symptoms arise. A primary examination will be done at your home by a medical team. Please refrain from using public transportation. Avoid public, domestic events as well as public places. Stay away from the outside person, as well as the other person in your family. Shri Narvekar appealed to the people to be more careful. The government has come to know that these people have been quarantined home since ordinary people have been sealed. If the home quarantined people appear to be moving, they should inform the governing body. Shri Narvekar has appealed to the Thane district residents not to be afraid of returning and should not act in any way that would hurt the concerned person.
  ठाणे:- परदेश प्रवास करून जिल्ह्यात येणाऱ्या, आलेल्या नागरिकांनी 14 दिवस घरीच होम कोरोन्टाईन करून घेवून घरामध्ये सुरक्षित रहावे, तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यास जिल्हा प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी केले आहे.
  जिल्हाधिकारी श्री नार्वेकर यांनी सांगितले, राज्य शासनाच्या निर्देशानुसार विमानतळावर करोनाग्रस्त देशांमधून येणाऱ्या प्रवाशांची तीन प्रकारांमध्ये विभागी करण्यात येत आहे. ए, बी आणि सी प्रकारामध्ये विभागले जात आहे. ए मध्ये थेट लक्षणे दिसणे प्रवासी, बी मध्ये वयस्कर प्रवासी आणि कुठलीही लक्षणे न दिसणारी सी कॅटेगरीमध्ये आहेत. ए आणि बी मधील प्रवाशांची चाचणी करुन त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. तर लक्षणे न दिसणाऱ्या सी प्रकारातील प्रवाशांची प्राथमिक तपासणी करुन त्यांना शिक्का मारून होम क्वॉरंटाइन सांगितले जात आहे.
  होम क्वॉरंटाइन केल्या जाणाऱ्या लोकांना निवडणुकांच्या वेळी मतदान केल्यानंतर लावली जाते तशा पद्धतीच्या शाईचा शिक्का मारला जात आहे. हातावरील शिक्क्यावर होम क्वॉरंटाइन कधी पर्यंत असणार आहे हे नमूद केले आहे.
  या नागरिकांनी मुदत असणाऱ्या दिनाकापर्यंत घराबाहेर पडणे टाळावे.  कुठल्याही प्रकारची वैद्यकीय अडचण भासल्यास अथवा लक्षणे आढळल्यास जिल्हा प्रशासनाशी तात्काळ संपर्क साधावा. आपल्या घरी वैद्यकीय पथकामार्फत प्राथमिक तपासणी करण्यात येईल. कृपया सार्वजनिक वाहतुकीच्या साधनांचा वापर टाळावा. सार्वजनिक,घरगुती समारंभ तसेच  सार्वजनिक ठिकाणी जाणे टाळावे. बाहेरील व्यक्ती बरोबरच आपल्या कुटुंबातील अन्य व्यक्तीपासून दूर रहा. जास्तीजास्त काळजी घ्या असे आवाहन श्री नार्वेकर यांनी केले आहे.
  शासनाने ह्या लोकांना होम क्वॉरंटाइन केलेलं आहे ते सर्वसामान्य नागरिकांना  शिक्के मारलेले असल्याने कळणार आहे. होम क्वॉरंटाइन केलेले लोक फिरताना दिसल्यास यासंबंधित शासकीय यंत्रणेला माहिती द्यावी. परतू याबाबत दहशत घेवू नये तसेच संबधित व्यक्तीला त्रास होईल असे कुठलेही वर्तन करू नये असे आवाहन श्री नार्वेकर यांनी ठाणे जिल्हावासीयांना केले आहे.

  No comments

  Post Top Ad

  Post Bottom Ad