Header Ads

 • ताजा खबरें

  शहापुरात हजारो कामगार-शेतकरी रस्त्यावर उतरत एक तास अडवला राष्ट्रीय महामार्ग

  Shahapur (Badlapur Vikas Media): Thousands of workers of Shahpur Taluka Situ and other unions took to the streets on January 3, calling for a one-day strike on January 5, calling on the central labor unions and various unions across the country to protest against the policies of the central government against common workers and farmers. It was held for an hour.        Taluka protests by local unemployed youths, peasants, laborers, demanding communal demands of the mass workers, Kisan Sabha, Marxist Communist Party's Jana Sangh, Kisan Sabha, Democratic Youth Federation, Students' Federation, Talukas. Thousands of workers, women and youths blocked the entire highway on National Highway No.1 on January 5, starting at 8am at Shahpur bus station.    In this agitation, immediately approve the proposals of forest land pending in the three demands of the country and local demands of the country. T Income, Degree, Diploma, Survey of educated youths and integrate them on a permanent basis in the factory in the taluka. Forgive the loans taken by the unemployed youths and peasant children for education, etc. S. Income Citu Hospital, along with Situ, Kisan Sabha along with Kisan Sabha, were marched on the streets demanding that the contractor attacking the workers of Ispi Glass be closed, close the contractual system and obey the minimum wage law.      Meanwhile, police tried to throw banners from the police while preventing the marchers from rastering them, but the divisional police officer and Shahapur police inspector Ghanshyam Adhav kept the police in check and did not do any wrong thing.
  शहापूर (बदलापूर विकास मिडिया):- केंद्र सरकारच्या सामान्य कामगार व शेतकरी विरोधात असणाऱ्या धोरणा विरोधात केद्रीय कामगार संघटना व देशपातळीवरील विविध संघटनानी पुकारलेल्या ८ जानेवारी रोजी एक दिवसीय संपाला पांठीबा देत शहापूर तालुका सिटु व अन्य संघटनेच्या हजारो कामगारांनी रस्त्यावर उतरत मुंबई- नाशिक महामार्ग क्रमांक- ३ तब्बल एक तास रोकुन धरला होता.
         स्थानिक बेरोजगार युवक युवती, शेतकरी कष्टकरी, जनसामान्यांच्या जिव्हाळ्याच्या मागण्या घेऊन सिटु कामगार संघटनेच्या नेत्रुत्वाखाली मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या जनसंघटना किसान सभा, जनवादी महीला संघटना, डेमोक्रेटिक युथ फेडरेशन, स्टुडंट्स फेडरेशन, या संघटनासह तालुक्यातील ध्येय धोरणांचा निषेध करण्यासाठी बुधवार दि. ८ जानेवारी २०२० सकाळी ११.३० वा शहापुर बसस्थानकातुन मोर्चाला सुरूवात होउन राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३ वर हजारो कामगार,महिला व युवकांनी तब्बल एक तास ठिय्या धरून संपूर्ण महामार्ग रोखून धरला.
     या आंदोलनात देशव्यापी संपाच्या १२ मागण्या व स्थानिक मागण्यांमध्ये वर्षानुवर्षे प्रलंबित वनदाव्यांचे प्रस्ताव तत्काळ मंजुर करा, तालुक्यातील ३-२ चे प्रस्ताव निकाली काढा, तालुक्यातील बेरोजगार आय. टी. आय, डिग्री, डिप्लोमा, सुशिक्षित युवक युवतींचे सर्वेक्षण करून तालुक्यातील कारखान्यात त्यांना योग्यतेप्रमाणे कायमस्वरूपी तत्वावर सामावुन घ्या. बेरोजगार युवक युवती व शेतकर्यांच्या मुलांनी शिक्षणासाठी घेतलेली कर्जे माफ करा, तालुक्यात इ. एस. आय. सी रूग्णालय ऊभारा.,इस्पी ग्लासच्या कामगारांवर हल्ला करणारे ठेकेदार यांच्यावर गुन्हा दाखल करा, कंत्राटी पद्धत बंद करा व किमान वेतन कायद्याचे पालन करा, कोटी विद्या प्रशासनाची चौकशी करा या एकुण ३० मागण्या घेवुन सिटु, किसान सभा सहीत मार्क्सवादी कम्युनिस्ट रस्त्यावर उतरले होते.
       दरम्यान पोलिसांनी मोर्चेकर्यांना रास्तारोको करण्यापासून रोखले असता मोर्चेकरी खुपच आक्रमक झाले होते त्यावेळी  पोलिसांनी लावलेले बँरेकेट देखील फेकण्याचा प्रयत्न केला पंरतु विभागीय पोलिस अधिकारी आणि शहापूर पोलिस निरीक्षक घनश्याम आढाव यांनी पोलिस बंदोबस्त चोख ठेवल्याने कुठलाही अनुचित प्रकार न घडता अंदोलान शांततेत झाले.

  No comments

  Post Top Ad

  Post Bottom Ad