Header Ads

 • ताजा खबरें

  ठाणे जिल्हा पशुवैदयक डाॅक्टर ८ जानेवारीला संपावर

  शहापूर (बदलापूर विकास मिडिया):- ८ जानेवारी रोजी एक दिवसाचा देशव्यापी संप होणार असून या संपात आपल्याही मागण्या मान्य होण्यासाठी पशुचिकीत्सा व्यवसायी संघटना महाराष्ट्र राज्य संपात उतरली असून या संपाला पाठींबा दर्शविण्यासाठी ठाणे जिल्हा परिषदेचे सर्व पशुवैदयक डाॅक्टर संपात सहभागी होत आहेत.
              महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राज्य संघटनेने एक निवेदन दिले आहे त्या निवेदनानुसार भारतीय पशुवैदयक परीषदेचा १९८४चा शेतकरी व पशुधन विरोधी काळा कायदा रद्द करण्यात यावा,तसेच महाराष्ट्रातील पदविकाधारक पशुवैदयकाना वेतनातून कायम प्रवास भत्ता मंजूर करावा,सातव्या वेतन आयोगातील बक्षी समिती कडे दिलेल्या वेतनत्रूटी दूर करणे,पशुसंवर्धन विभागातील पशुधन पर्यवेक्षक यांची रिक्त पदे तातडीने भरणे व जिल्हा परिषद स्तरावरील सहाय्यक पशुधन विकास अधिकारी पदांची पदोन्नती प्रक्रीया तातडीने राबविणे या व इतर अनुषंगीक मागण्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्र शासनाकडे प्रलंबित आहेत या मागण्याकडे लक्ष वेधण्यासाठी पशुचिकीत्सा व्यवसायी संघटना ८जानेवारी च्या एक दिवसीय संपात सहभागी होत असल्याची घोषणा राज्य अध्यक्ष डाॅ. सुनील काटकर व राज्य सरचिटणीस डाॅ. मारोती कानोले यांनी एका निवेदनातून केली आहे.
         "ठाणे जिल्ह्यातही या संपाला शंभरटक्के प्रतिसाद मिळेल व संपूर्ण ठाणे जिल्ह्यातील पशुवैदयक सेवा एक दिवस पूर्णपणे ठप्प होतील असे पशुचिकीत्सा व्यवसायी संघटनेचे लढाऊ कर्मचारी नेते."
  - डाॅ. दिलीप धानके.नेते
  पशुचिकीस्ता व्यवसायी संघटना

  No comments

  Post Top Ad

  Post Bottom Ad