Header Ads

 • ताजा खबरें

  बदलापूरच्या नागरिकांसाठी राष्ट्रवादी कांग्रेस आयोजित आधार कार्ड शिबिर व सुकन्या योजना नांव नोंदणी

  बदलापूर (बदलापूर विकास मिडिया)- बदलापूर शहरातील ज्या नागरिकांचे आधार कार्ड बनविणे राहिले आहे किंवा ज्या नागरिकांचे आधार कार्ड वरील नाव किंवा इतर माहिती चुकीची आली आहे व ते दुरुस्त करणे राहुन गेले आहे त्यांच्यासाठी दि. 16 जानेवारी ते दि. 18 जानेवारी असे तीन दिवस आधार कार्ड शिबिराचे आयोजन बदलापूरात होणार आहे. राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे बदलापूर शहराध्यक्ष व गटनेते कॅप्टन. आशिष दामले यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
  राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीचे मध्यवर्ती कार्यालय, शॉप नं. 7 - 8, अंबरनाथ - बदलापूर रोड, बेलवली, बदलापूर पश्चिम याठिकाणी 16 ते 18 जानेवारी असे तीन दिवस सकाळी 10 ते सायंखाळी 5 वाजेपर्यंत आधार कार्ड नविन नांव नोंदणी, दुरुस्ती तसेच सुकन्या योजना नांव नोंदणी होणार आहे. आधार कार्ड शिबिरात येतांना शाळा सोडल्याचा दाखला, पॅनकार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, नगरपालिका टॅक्स पावती, मतदान ओळखपत्र, लाईट बिल, रेशनकार्ड व 2 फोटो हे कागदपत्रे आवश्यक असुन जास्तीत जास्त नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे कॅप्टन. आशिष दामले यांनी बदलापूर विकास मिडियामार्फत आवाहन केले आहे.

  1 comment:

  1. नाव नोंदणी करणे आवश्यक आहे का , सेम दिवशी आलं तरी होईल

   ReplyDelete

  Post Top Ad

  Post Bottom Ad