Header Ads

  • ताजा खबरें

    बदलापूरातील गोळेवाडी-शिवाजी चौक परिसरात भटक्या कुत्र्यांना विष देऊन मारण्याचा प्रकार सुरु

    पोलिसात लेखी तक्रार अर्ज दाखल

    -#STOPPOISONING हैशटैक देत सोशल मिडियावर जनजागृती सुरु
    Badlapur (Badlapur Development Media) - In the eastern section of the Kulgaon Badlapur Municipal Council area, poisoning of stray dogs has been reported from the past few days. In particular, to reduce the number of stray dogs in Golwadi, Shivaji Chowk area for the past several years, preliminary estimates have been made that a person with a deformed person started poisoning animals by giving them poisonous food.  For the past several months, Manisha Nader, a resident of Golwadi, had been feeding eight stray dogs every day in her area and taking them to the animal hospital if the needy animals ever needed treatment. But over the past few days, 5 of those 8 dogs suddenly disappeared on the same day and those 5 dogs were found dead in the area. Nader said the animals died of poisoning, adding that someone was deliberately doing the act. Therefore, they have filed a written complaint with the Badlapur East Police and demanded that the citizens be alert as dogs are poisoned in Golwadi Shivaji Chowk area by issuing a stop pointing hash tag on social media.  Earlier, a similar incident had happened in the Shaninagar area of ​​Badlapur West Zone. There, even poison was used to kill poisonous animals, giving them mixed pieces of poison. Due to all these actions, it is now difficult for the silent animals to live in Badlapur city and the local police are demanding the citizens to pay attention.
    बदलापूर (बदलापूर विकास मिडिया)- कुळगांव बदलापूर नगरपरिषद हद्दीतील पूर्व विभागात मागील काही दिवसांपासुन भटक्या कुत्र्यांचे विष प्राशनाने मृत्यु होण्याची घटना घडत आहे. विशेष म्हणजे गोळेवाडी, शिवाजी चौक या परिसरातील मागील अनेक वर्षांपासुन जे भटके कुत्रे होते त्यांची संख्या कमी करण्यासाठी म्हणुन कोणीतरी विकृत व्यक्तिकडून मुक प्राण्यांना विषारी खाद्यपदार्थ देऊन त्यांचे जीव घेण्याचे प्रकार सुरु असल्याचे प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
    गोळेवाडी येथील मनिषा नाडर या महिला रहिवाशी मागील अनेक महिन्यांपासुन त्यांच्या परिसरातील 8 भटक्या कुत्र्यांना दररोज जेवण देत होत्या व मुक प्राण्यांना कधी उपचाराची गरज लागल्यास प्राण्यांच्या रुग्णालयात घेऊन जात होत्या. परंतु मागील काही दिवसात त्या 8 मधील 5 कुत्रे हे अचानक एकाच दिवशी गायब झाले व त्या 5 ही कुत्रे परिसरात मृत अवस्थेत आढळले. विषबाधेमुळे त्या प्राण्यांचा मृत्यु झाल्याचे नाडर यांचे म्हणणे असुन हे कृत्य कोणीतरी विकृत जाणुनबूजुन करत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे त्यांनी बदलापूर पूर्व पोलिसात लेखी तक्रार अर्ज देत सोशल मिडियावर स्टॉप पोइझनिंग हैश टैग देत गोळेवाडी शिवाजी चौक परिसरात कुत्र्यांना विष दिले जात असल्याने नागरिकांनी सतर्क रहावे असे आवाहन केले आहे.
    यापुर्वी अश्याच प्रकारची घटना बदलापूर पश्चिम विभागातील शनिनगर परिसरात घडली होती. त्याठिकाणी सुद्धा मुक प्राण्यांना मारण्यासाठी विष मिश्रित पावाचे तुकडे देऊन विषबाधा करण्याचे प्रकार होत होते. या सर्व कृत्यामुळे आता मुक प्राण्यांना देखील बदलापूर शहरात जगणे मुश्किल झाले असुन स्थानिक पोलिसांनी लक्ष देण्याची नागरिकांची मागणी आहे.

    No comments

    Post Top Ad

    Post Bottom Ad