Header Ads

 • ताजा खबरें

  गणपत शिर्के यांचे ह्रदय विकाराच्या झटक्याने निधन

  Shahapur (Badlapur Vikas Media): Kamalu Shirke, a businessman from Shenwa, a political, social sector in the taluka, died on Saturday morning of a severe heart attack. He was 64 at the time of his death. Ganpat Shirke, originally from Narayangaon, had settled in Shenwa for business reasons. As an agricultural officer, he has also worked in government for some years. Shirke, who left government service for some unavoidable reason, had stepped into the political arena. He had close relations with the office bearers of all political parties in the taluka. Meanwhile, an unfortunate incident of Ganpat Shirke has caused grief over the Shirke family and mourning has spread in the area. He is survived by his wife Alcabai, son Pramod, Nitin, Suna and grandchildren.
  शहापूर  (बदलापूर विकास मिडिया):- तालुक्यातील राजकीय, सामाजिक क्षेञात पारंगत असलेले व शेणवा येथील व्यवसायिक गणपत कमळु शिर्के यांचे शनिवारी पहाटे ह्रदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. मृत्युसमयी ते 64 वर्षांचे होते. मुळचे नारायणगाव येथील गणपत शिर्के हे व्यवसायानिमित्त शेणवा येथे स्थायिक झाले होते. कृषी अधिकारी म्हणुन काही वर्षे त्यांनी शासकीय कामकाज देखील केलेले आहे. काही अपरिहार्य कारणास्तव शासकीय सेवा सोडणाऱ्या शिर्के यांनी राजकीय क्षेञात पाऊल टाकले होते. तालुक्यातील सर्वच राजकीय पक्षांतील पदाधिकाऱ्यांशी त्यांचे मैञीपुर्ण संबंध होते. दरम्यान गणपत शिर्के यांच्या दुर्दैवी घटनेने शिर्के कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असुन परिसरात शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी अलकाबाई, मुलगा प्रमोद, नितीन, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

  No comments

  Post Top Ad

  Post Bottom Ad