Header Ads

 • ताजा खबरें

  चारशे वर्षे परंपरेच्या ठूणे यात्रौत्सवास आजपासून सुरूवात

  शहापूर (बदलापूर विकास मिडिया):- शहापूर तालुक्याच्या किन्हवली परीसरातील सांस्कृतिक पार्श्वभूमी असलेल्या  ठुणे गावच्या यात्रौत्सवाला सोमवार दि.06 जानेवारी पासुन ऊत्साहाने सुरूवात झाली आहे.शहापूरचे आमदार दौलत दरोडा यांच्या शुभहस्ते सकाळी सहा वाजता विठ्ठल रखुमाईची महापुजा झाल्यानंतर यात्रौत्सवाला सुरूवात झाली. या यात्रेचे यंदाचे हे 409 वे वर्ष आहे.
    पौष महिन्याच्या पुत्रदा एकादशीला शहापूरचे आमदार दौलत दरोडा यांच्या हस्ते सकाळी सहा वाजता महापूजेने ठूणे येथील तीन दिवसांच्या यात्रौत्सवास सुरूवात झाली आहे
  असे सांगीतले जाते की,सुमारे चारशे वर्षांपूर्वी पांडुरंगाचे निस्सीम भक्त संत गोरा कुंभार यांचे पुर्वज ठूणे गावात व्यवसायानिमीत्त स्थलांतरीत झाले होते. गावकूसाबाहेर एका शेतात उतरलेले कुंभार कुटूंब मातीची भांडी बनवून ती परीसरात विकत असत.विठ्ठलाच्या निस्सीम भक्तीपोटीच त्यांनी तिथे पुत्रदा एकादशीच्या दिवशी श्री विठ्ठल-रखुमाई मुर्तीची स्थापना केली. तेव्हा पासून ठूणेची यात्रा आजतागायत अखंडीत सुरू आहे. पुत्रप्राप्तीसाठी पावणारा विठोबा अशी ख्याती असल्याने ठाणे,मुंबई, नगर, नाशिक, पूणे अशा ठाणे जिल्ह्याच्या सरहद्दीवर असलेल्या जिल्ह्यांतून शेकडो भाविक या ठिकाणी येऊन नवस  बोलतात. येथील मुस्लीम कुटूंबातील अहमदभाई यास विठ्ठलाने दिलेल्या दृष्टांतानुसार यात्रेच्या दिवशी विठ्ठल रखुमाईचा पोषाक या मुस्लीम कुटूंबाकडून दिला जातो.ठूणे यात्रेचे यंदाचे हे चारशे नऊ (409) वर्ष असून अलीकडच्या काळात या मंदिराचा जिर्णोध्दार झाला आहे.
  याञेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे
  भजन,किर्तन,भारूडाबरोबरच मनोरंजनासाठी येथे आकाश पाळणे, तमाशाचे फडही रंगतात.स्थानिक हौशी मंडळांकडून क्रिकेटचे सामनेही आयोजीत करण्यात येतात.तीन दिवस पंचक्रोशीत पाहुण्यांची रेलचेल असते.ठुणे गावातील घर घर पाहुण्यांनी भरलेले असते.
    पुर्वी 15 दिवस चालणारी याञा  काळाच्या ओघात तीन दिवसावर येऊन ठेपली आहे.या अगोदर वाण सामानासह, डाळी, मिरच्या अशा मसाल्याच्या पदार्थांची खरेदी विक्री होत असे,भांडी, मिठाई,बांगड्या, घोंगड्या,चादरी, ब्लॅंकेट, टाळ, मृदूंग, मुलांची खेळणी, शेतीची औजारे यांची वारेमाप खरेदि विक्री होते.  
    अनेक धार्मिकविधी, भजन -किर्तनाचा अखंड नामघोष अशा वातावरणात शेवटच्या दिवशी काल्याचे किर्तन होऊन यात्रौत्सवाची सांगता होते व भक्तांना ओढ लागते ती दुस-या दिवशी लगेचच भरणा-या मुरबाड तालुक्यातील म्हसा यात्रेची !

  No comments

  Post Top Ad

  Post Bottom Ad