Header Ads

 • ताजा खबरें

  गुन्हेगारी पार्श्वभुमी असतांनाही पोलिस खात्यात व.पो.नि. पदावर काम करणार्या लक्ष्मण सारिपुत्रला सस्पेंड करण्याची टायगर ग्रुपची मागणी

  मंगळवारी टायगर ग्रुपचे  शिष्टमंडळ ठाणे पोलिस आयुक्त विवेक फसळकर यांची भेट घेणार

  Badlapur (Badlapur Vikas Media) - The Supreme Court on Wednesday released him on a bail of Rs 25,000 after a Supreme Court judge acquitted him of Seychelles and the Mumbai High Court after a senior police inspector of Badlapur West Police Station, Laxman Sariputra, was charged with a crime under Section 302 and a court order went viral on social media. Badlapur is a hotbed of discussion everywhere General Chat Chat Lounge Many citizens of Badlapur city have been shocked at the appointment of senior police inspector of Badlapur West Police Station, who is accused of murdering a public servant and a criminal. In Malvan police station, in 1994, one of the accused was brutally beaten by police in a lockup. That policeman was the then deputy inspector of Malvan police station, Laxman Mahadev Sariputra. Bhagavi Section 302 was filed against Sariputra after the accused breathed his last breath in lockup due to reckless beatings. In which Sindhudurg Sessions Court convicted them. After 20 years, Laxman Mahadev Sariputra tried to rescue himself from this case. The Supreme Court appealed to the Bombay High Court, but the Hon'ble Judge Honors upheld the order. Finally, after appealing from the Supreme Court, Laxman Sariputra was released on 25,000 bail. Notably, this case was not noticed by anyone and a few years back, Laxman Mahadev Sariputra took charge of the post of senior police inspector at Badlapur West Police Station. On the basis of court orders and other evidence that is currently going viral on social media, Laxman Mahadev Sariputra, who was a accused in the murder of a public servant, was an accused. On which base did he appoint a senior police inspector to the Maharashtra Police Department? Why didn't the public servants who were accused of presenting bribery and perjury, as well as beating the accused in lockup, were suspended and sent to jail? How appropriate is it that the accused, who died in jail in this case, was found guilty in the investigation and he was the victim of an innocent? With many such questions arising, now Tiger Group Maharashtra state Kalyan Ulhasnagar district president Ershad Bhai Sheikh has launched a campaign against accused Laxman Mahadev Sariputra. Talking to the media, Tiger Group's Kalyan Ulhasnagar district president, Ershad Bhai Sheikh said that Laxman Mahadev Sariputra has treated the complainant with many complainants while performing the post of senior police inspector of Badlapur West. Importantly, since the appointment of Badlapur, there has been a threefold increase in the number of burglaries in the city of Badlapur especially those who do not immediately report the victims. A senior citizen was abducted and beaten in the city on a day-to-day basis but did not take the case. Finally, the seniors filed a case after the order but did not name the accused. He threatened to implicate a woman activist of NCP. In Badlapur, Laxman Sariputra always threatens to falsely impersonate, Chapter, slaughter and mock the complainants against immoral practices. These Sariputras demand money to file the victim's complaint and register the accused. Recently, they demanded permission to hold a rally on NRC issue and deported the youth from Badlapur West Police Station, saying that they should flee to UP. He filed charges against a journalist but also for false ransom. There are many things that Laxman Sariputra does and it seems that somewhere he is taking advantage of the khaki uniform. Also, after seeing their plot on social media recently, Maharashtra Police Department filed a complaint with 302 and out on bail, how did Laxman Mahadev Sariputra take over as Senior Inspector of Police in Police Department? On January 14, 2019, Thane will meet the Commissioner of Police Vivek Phansalkar and make a statement. He also warned that the Tiger Group would launch a march on the Maharashtra Police Commissioner of Police if it did not immediately suspend Laxman Mahadev Sariputra. On social media, Lakshman Sariputra is believed to have strongly opposed saying that the citizens of Lakshman Sariputra should move out of the entire Badlapur city after the court order and other evidence went viral.
  बदलापूर (बदलापूर विकास मिडिया)- नुकताच सोशल मिडियावर बदलापूर पश्चिम पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक लक्ष्मण महादेव सारिपुत्र यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल असुन त्यांना सुप्रिम कोर्टाने 25 हजाराच्या जामिनावर सुटका केल्याचे समजते. त्यामुळे गुन्हेगार पार्श्वभुमी असतांनाही त्यांना पुन्हा महाराष्ट्र पोलिस खात्यात ते कसे रुजु झाले  असा प्रश्न मागील दोन दिवसांपासुन अनेकांना पडला असुन अश्या आरोपीला पोलिस खात्यातून हकालपट्टी करण्यात यावी अशी नागरिकांनी मागणी केली असुन गुन्हेगार पार्श्वभुमी असलेल्या बदलापूर पश्चिम पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक लक्ष्मण महादेव सारिपुत्र यांची हकालपट्टी करुन त्यांची चौकशी करण्याची तसेट पी.एफ. व इतर सुविधा तातडीने थांबवावे व दिलेला पगार वसुल करावा अशी टायगर ग्रुप कल्याण उल्हासनगर जिलाध्यक्ष इरशाद भाई शेख यांनी मागणी केली आहे.
  बदलापूर पश्चिम पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक लक्ष्मण सारिपुत्र हे भादवि कलम 302 अन्वये एका गुन्ह्यात आरोपी असुन त्यांना सिंधुदुर्ग सेशल कोर्ट व मुंबई उच्च न्यायालयाने दोषी म्हटल्यानंतर सुप्रिम कोर्टाने त्यांना 25 हजाराच्या जामिनावर त्यांची सुटका केल्याचे वृत्त आणि कोर्ट ऑर्डर सोशल मिडियावर व्हायरल झाल्यानंतर बदलापूर शहरात सर्वत्र चर्चेला उधाण आले आहे. खुनाचा आरोप ज्या लोकसेवकावर आहे व गुन्हेगारी पारर्श्वभुमी असतांना बदलापूर पश्चिम पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पदी नियुक्ती केलीच कशी असा प्रश्न बदलापूरकरांना पडला आहे. 
  मालवण पोलिस ठाण्यात सन 1994 मध्ये एका गुन्ह्यात एका आरोपीला लॉकअप मध्ये बेदम मारहाण पोलिसाने केले होते. ते पोलिस म्हणजे त्यावेळचे मालवण पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक लक्ष्मण महादेव सारिपुत्र. बेदम मारहाणीमुळेआरोपीने लॉकअप मध्येच श्वास सोडल्याने सारिपुत्र विरोधात भादवि कलम 302 चा खटला चालवण्यात आला. ज्यामध्ये सिंधुदुर्ग सेशन कोर्टाने त्यांना दोषी ठरविले. त्यानंतर तब्बल 20 वर्ष लक्ष्मण महादेव सारिपुत्र यांनी सदर केसमधून स्वतःची सुटका करण्यासाठी आतोनात प्रयत्न केले, मुंबई उच्च न्यायालयात सुद्दा अपिल केले परंतु माननीय न्यायाधीश महोदयांनी त्यांची अपिल फेटाळत सदर ऑर्डर कायम ठेवले. शेवटी सुप्रिम कोर्टात त्यांनी अपिल केल्यानंतर 25 हजाराचा जामिना त्यांना मंजुर झाला. विशेष म्हणजे हे प्रकरण जास्त कोणाच्या लक्षात आले नाही व ते पुन्हा महाराष्ट्र पोलिस खात्यात नोकरीला रुजु झाले ते देखील प्रमोशन सह.  लक्ष्मण महादेव सारिपुत्र यांनी बदलापूर पश्चिम पोलिस ठाण्यात वरिष्ठ पोलिस निरीक्षक पदाचा चार्ज सांभाळला.
  सोशल मिडियावर सध्या व्हायरल होत असलेले कोर्ट ऑर्डर व इतर पुरावे पाहिल्यावर लक्ष्मण महादेव सारिपुत्र या लोकसेवकावर खुनाचा गुन्हा दाखल असुन ते एक आरोपी असतांना त्यांनी महाराष्ट्र पोलिस खात्याने कोणत्या बेसवर वरिष्ठ पोलिस निरीक्षक पदावर त्यांनी नियुक्ती केली? लाचखोरी आणि खोट्या पुरावे सादर करणे तसेच लॉकअप मध्ये आरोपीला बेदम मारहाण करणे असले आरोप ज्या लोकसेवकावर आहे त्यांनी सस्पेंड करुन त्यांना तुरुंगात का पाठविण्यात आले नाही? कालांतराने सदर केसमधील तुरुंगात जीव लेगेल्या आरोपी हा निर्दोष असल्याचे तपासात निष्पन्न झाले असुन एका निष्पापाचे बळी गेले हे कितपत योग्य आहे? असे अनेक प्रश्न उदभवत असुन आता टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य चे कल्याण उल्हासनगर जिलाध्यक्ष इरशाद भाई शेख यांनी आरोपी लक्ष्मण महादेव सारिपुत्र विरोधात मोहिम सुरु केली आहे.
  टायगर ग्रुपचे कल्याण उल्हासनगर जिलाध्यक्ष इरशाद भाई शेख यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले कि, लक्ष्मण महादेव सारिपुत्र यांनी बदलापूर पश्चिम वरिष्ठ पोलिस निरीक्षक पदी कर्तव्य पार पाडतांना अनेक तक्रारदारांशी आजवर उर्मटपणे वागले. महत्वाचे म्हणजे त्यांची बदलापूरात नियुक्ती झाल्यापासुन बदलापूर शहरात घरफोडीच्या गुन्ह्यात तीन पट वाढ झाली आहे विशेष म्हणजे पिडीतांची तक्रार सुद्धा ते तातडीने घेत नाहीत. शहरात एका ज्येष्ठ नागरिकाचे दिवसा ढवळ्या अपहरण झाले व मारहाण झाली परंतु त्यांनी केस घेतले नाही शेवटी वरिष्ठांनी आदेश दिल्यानंतर केस दाखल केले परंतु आरोपीचे नाव टाकले नाही. राष्ट्रवादीच्या एका महिला कार्यकर्त्याला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली. बदलापूरात अनैतिक धंद्यांविरोधात तक्रार करणार्यांना खोटे केस लावण्याची, चाप्टर, तडिपारी आणि मोका लावण्याची धमकी लक्ष्मण सारिपुत्र नेहमी देत असतात. पिडीतेची तक्रार दाखल करुन आरोपीचे नाव नोंदवण्यासाठी हे सारिपुत्र पैश्यांची मागणी करतात. नुकताच त्यांनी एनआरसीच्या विषयावर रैली काढण्यासाठी परवानगीची घेण्यासाठी बदलापूर पश्चिम पोलिस ठाण्यात आलेल्या तरुणांना शिवीगाळी करुन चल युपीला पळून जा असे बोलून हाकलुन दिले. त्यांनी एका पत्रकाराविरोधात पण खोटे खंडणीचे गुन्हे दाखल केले. असे अनेक गोष्टी लक्ष्मण सारिपुत्र हे करत असुन कुठेतरी ते खाकी वर्दीचा गैरफायदा घेत आहेत हे लक्षात येत. तसेच नुकताच सोशल मिडियावर त्यांचे कारस्थान लक्षात आल्यानंतर महाराष्ट्र पोलिस खात्याने 302 चा गुन्हा दाखल असलेल्या व जामिनावर बाहेर असलेल्या लक्ष्मण महादेव सारिपुत्र ला पुन्हा पोलिस खात्यात वरिष्ठ पोलिस निरीक्षक म्हणुन कसे काय घेतले म्हणुन टायगर ग्रुप महाराष्ट्र चे शिष्ट मंडळ मंगळवार दि. 14 जानेवारी 2019 रोजी ठाणे पोलिस आयुक्त विवेक फणसलकर यांची भेट घेऊन निवेदन देणार आहे. तसेच तातडीने जर लक्ष्मण महादेव सारिपुत्र यांना सस्पेंड करुन त्यांची चौकशी सुरु केली नाही तर टायगर ग्रुप महाराष्ट्र ठाणे पोलिस आयुक्तालयावर मोर्चा काढणार असा इशारा ही त्यांनी दिला आहे.
  सोशल मिडियावर लक्ष्मण सारिपुत्र यांचे कोर्ट ऑर्डर व इतर पुरावे व्हायरल झाल्यापासुन संपुर्ण बदलापूर शहरातून नागरिक लक्ष्मण सारिपुत्रे चले जाव असे म्हणत जोरदार विरोध करत असल्याचे समजते.

  No comments

  Post Top Ad

  Post Bottom Ad