Header Ads

 • ताजा खबरें

  बदलापूर पश्चिम हद्दीत पुन्हा घरफोडी ; सुमारे 9 लाख रुपयांचे दागीने चोरले

  Badlapur (Badlapur Vikas Midia)- Kulgaon Badalapoor West Haddit Magil Kahi Mahyanapanasun Gharphodya Ghatte Mothya Adhia Adhia Adh Adh Adh Asun Nukatach Badlapur West Belovely Jadhav Colony Yethel Dinesh Mhaskar or Professionalchorya Gharfodi Kelyche Samjate. The day. 5 Janwari Rosie Dinesh Mhuskar O Kutumbaco Baher Firanyasthi Galle, Tasech Dusya Divashi Ghari Paratlyavar Gharatiel Usher Sacche Kadi Koynda Tutlelya. Tasech Bedroom middle-aged asta valves The north-eastern Tanyani Badalalapader West Police Thanyat Dhav Ghitli Assun Tabbal 24 Tasantar D. 7 January 2020 Rosie Badlapur West Police Thanyat Tyanchi Firyad Gheyat Aali. Unidentified accused, Antiat Bhadvi pen 380, 454, 457 anvive gunha dakhal karniat ala asun police accusedcha research ghat aslyache tapas adhikariche mhhane ahe. Magil Kahi Mahiyanpasun Sine Type Badlapur West Haddit Gharphodice Proof 100 Patine Wadht Aslyache Dit Asanyaan Kutha Tari Chorana Naital Badlapur West Polisanchi Dhak Rahili Nahi Ashi Shahrat Discussion Ahe. Tasech Kahi Thaki tar thet badlapur West Police Thanyache Senior Police Inspector J Gunhegar Laterbhumiche Aheth Tech Choransobat Sangnamat Karun Gharphodi Karat Aslyachi Shachita Nahe Akse Bole. Yamuhe Police Commissioner Vivek Funsalkar Yanich a aa badlapur west haddit laksh dene garzeche asiyache samjate.
  बदलापूर (बदलापूर विकास मिडिया)- कुळगांव बदलापूर पश्चिम हद्दीत मागील काही महिन्यांपासुन घरफोडीच्या घटनेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असुन नुकताच बदलापूर पश्चिम बेलवली जाधव कॉलनी येथील दिनेश म्हस्कर या व्यवसायिकाच्या घरी अज्ञात चोरट्यांनी घरफोडी केल्याचे समजते.
  दि. 5 जानेवारी रोजी दिनेश म्हस्कर हे कुटुंबासह बाहेर फिरण्यासाठी गेले होते तसेच दुसर्या दिवशी घरी परतल्यावर घरातील प्रवेश द्वाराचे कडी कोयंडा तुटलेल्या अवस्थात आढलुन आले. तसेच बेडरुम मध्ये पाहिले असता कपाटातील सामान अस्तव्यस्त अवस्थेत आढळुन आले तसेच नुकताच त्यांनी बैंकेच्या लॉकर मधून त्यांच्या पत्नि व सासूचे सुमारे 9 लाख रुपये किमतीचे दागदागिने आणुन कपाटात ठेवले होते ते देखील चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी बदलापूर पश्चिम पोलिस ठाण्यात धाव घेतली असुन तब्बल 24 तासानंतर दि. 7 जानेवारी 2020 रोजी बदलापूर पश्चिम पोलिस ठाण्यात त्यांची फिर्याद घेण्यात आली.
  अज्ञात आरोपी विरोधात भादवि कलम 380, 454, 457 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन पोलिस आरोपीचा शोध घेत असल्याचे तपास अधिकारीचे म्हणणे आहे.
  मागील काही महिन्यांपासुन ज्या प्रकारे बदलापूर पश्चिम हद्दीत घरफोडीचे प्रमाण 100 पटीने वाढत असल्याचे दिसत असल्याने कुठे तरी चोरांना देखील बदलापूर पश्चिम पोलिसांची धाक राहिलेली नाही अशी शहरात चर्चा आहे. तसेच काही ठिकाणी तर थेट बदलापूर पश्चिम पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जे गुन्हेगार पार्श्वभुमीचे आहेत तेच चोरांसोबत संगनमत करुन घरफोडी करत असल्याची शक्यता नाकारता येत नाही असे बोलले जाते. त्यामुळे पोलिस आयुक्त विवेक फणसलकर यांनीच आता बदलापूर पश्चिम हद्दीत लक्ष देणे गरजेचे असल्याचे समजते.

  No comments

  Post Top Ad

  Post Bottom Ad