Header Ads

  • ताजा खबरें

    शिवसेना नगरसेवक तुषार बेंबळकर यांच्या वाढदिवसाला आमदार किसान कथोरे यांची उपस्थिती

    बदलापूर:- शिवसेना नगरसेवक व बदलापूर शहरातील तरुणांचे नेतृत्व करणारे तरुण तडफदार तुषार बेंबळकर यांचा काल वाढदिवस होता. त्यांच्या चाहत्यांनी बेंबळकर यांचा वाढदिवस अत्यंत थाटामाटात धुमधडाक्यात बेलवली येथील त्यांच्या जनसंपर्क कार्यालय जवळ उत्साहात साजरा केला. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी बदलापूर, मुरबाड, कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ, मुंबई शहर व ठाणे जिल्ह्यातील नागरिक, शिवसेना - भाजप व इतर राजकीय पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी, नगरसेवक, खासदार, आमदार, पोलीस खात्यातील अधिकारी कार्मचारी यांनी वाढदिवस कार्यक्रमाला उपस्थिती लावून तुषार बेंबळकर यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. भाजपाचे लोकप्रिय आमदार मा. किसनराव कथोरे यांनी देखील काल वाढदिवस कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित राहून तुषार बेंबळकर यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा व आशीर्वाद दिले व समाजसेवा करताना भिऊ नकोस  मी तुज्या पाठीशी आहे असा आशीर्वाद ही दिला.  
    आमदार कथोरे यांच्यासोबत वरिष्ठ समाजसेवक, पदाधिकारी व उद्योजक कृष्णा शिंदे, सागर सावंत व इतर भाजप पदाधिकारी , कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. त्याच सोबत कु. ब. न. प. चे कर्तव्यदक्ष नगराध्यक्षा सौ. विजया मोहन राऊत, शिवसेनेचा ढाणावाघ उपशहरप्रमुख प्रवीण राऊत, त्यांचे पत्नी नगरसेविका शीतल राऊत, भाजपचे नगरसेवक सुरज मुठे व आपटेवाडी शिरगाव परिसरातील शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी देखील बेंबळकर यांना पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
    शिवसेना नगरसेवक तुषार बेंबळकर यांनी राजकारणात प्रवेश केल्यापासून बदलापूर व मुरबाड सह परिसरातील विविध शहरातील नागरिकांसाठी त्यांनी अनेक समाजकार्य केले. निस्वार्थ भावनेने त्यांनी नेहमी नागरिकांची व विशेष करून तरुणांच्या विकासासाठी प्रयत्न केले असल्याने आज हजारोच्या संख्येत तरुण कार्यकर्ते खंबीरपणे तुषार बेंबळकर यांच्या पाठीशी उभे असतात. 
    बेंबळकर हे शिवसेना पक्षाचे नगरसेवक असले तरी ते शिवसेना सह भाजप राष्ट्रवादी व इतर पक्षातील राजकीय नेत्यांना पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन समाजकार्य करतात. मा. स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितल्याप्रमाणे ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण हीच नीती ते अमलात आणत असल्याने तळागाळातील लोक त्यांच्याशी जुळलेले आहेत. त्यांच्या प्रेमळ स्वभावामुळे स्वतः आमदार किसन कथोरे सुद्धा त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा व आशीर्वाद देण्यासाठी त्यांनी कार्यक्रमात उपस्थिती आणली होती.

    आता बदलापूर विकासच्या बातम्या इंग्रजी वाचकांसाठीही उपलब्ध, बातम्यांच्या लिंकवर किल्क कर -
    - Vote for Sai Vineet Joshi to make her the Royal singer...
    - MLA Kisan Kathore's presence at Shiv Sena corporator...
    - Badlapur station to Shashwat Park - Deepali stand...
    - Shiv Sena's MLA can be elected even if the candidate...
    - Finally, the campaign against anti-encroachment began...
    - Nationalist party to observe indefinite hunger strike...
    - ‘Michael's gambling den’ in Murbad municipality building...
    Kharvai handcart mafias causing chaos in the Badlapur city...

    No comments

    Post Top Ad

    Post Bottom Ad