Header Ads

 • ताजा खबरें

  खरवई येथील हातगाडी माफियांचा बदलापूर शहरात हैदोस

  '७ हजार पगार देऊन परप्रांतीयांकडून चालविले जाते अनधिकृत हातगाडी' 
  *अधिकारी सरमळकर अनधिकृत्त हातगाडीवर कारवाई न करण्यासाठी हफ्ता घेत असल्याचा आरोप*
  व्हिडीओ पाहण्यासाठी लिंक वर क्लिक करा - https://bit.ly/2CmoKwJ  
  बदलापूर:- नुकताच कुळगाव बदलापूर नगरपालिकेने अनधिकृत बांधकाम व अतिक्रमणावर धडक कारवाई केल्यानंतर आता तशीच कारवाई कुळगाव बदलापूर शहरातील अनधिकृत्त हातगाडी वाल्यांवर देखील कारवाई व्हावी म्हणून भाजपा नगरसेवक संभाजी शिंदे यांनी सोशल मीडिया वर एक व्हिडीओ पोस्ट केले असून त्या व्हिडीओ मध्ये त्यांचे म्हणणे आहे कि, खरवई परिसरातील कोणतरी एक मोठा ठेकेदार हा अनेक परप्रांतीयांना ७००० रुपये महिना पगार देऊन त्यांना बदलापूर शहरात विविध ठिकाणी अनधिकृत्त हातगाडी लावण्यास सांगत आहे. या परप्रांतीयांना मासिक ७ हजार पगार देऊन त्यांच्याकडून हातगाडी लावून होणारा धंदा स्वतः कडे ठेवत आहे. अशाप्रकारे कुळगाव बदलापूर शहरामध्ये ह्या प्रत्येक रस्त्यावरच्या हातगाड्या ह्या परप्रांतीयांच्या कोणत्यातरी मोठ्या ठेकेदाराचे आहेत.
  ह्या अनधिकृत्त हातगाडी शहरात जागोजागी रस्त्यावर लागल्याने दररोज रहदाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अनेक ठिकाणी ट्राफिक जाम देखील होतानाचे चित्र दिसत आहे. ज्यामुळे अश्या अनधिकृत्त हातगाडीवर नगरपालिका अतिक्रमण विभागाने कारवाई केलीच पाहिजे म्हणून नगरसेवक संभाजी शिंदे यांनी ह्या विषयावर पाठपुरावा केला आहे. त्यांनी ह्या अनधिकृत हातगाडी वाल्यांशी संवाद साधून ह्या लोकांचा गॉड फादर कोण हे देखील जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी आपल्या वार्ड मध्ये अनधिकृत पणे  हातगाडी लावणाऱ्यांना विचारणा केली असता एका फेरीवाल्याने सांगितले कि, खरवाई येथील भोरा नावाचा परप्रांतीय ७००० रुपये महिना पगार देऊन आम्हाला त्याठिकाणी हातगाडी लावण्यास सांगितले असून दररोज होणारा  सर्व धंदा त्या ठेकेदाराला दिले जाते. 
  दुसर्या फेरीवाल्याने सांगितले कि, शबाब खान यांची हातगाडी असून आम्हाला महिना ७ हजार पगार आहे, आम्ही ५-६ जणी त्यांच्याकडे कमला असून प्रत्येकाला एक एक हातगाडी लावायला दिली आहे. रोज होणारा पूर्ण धंदा आम्ही गाडीमालकाला देतो.
  रस्त्यावर धंदा करणाऱ्या फेरीवाल्यांचे पाहून आपल्याला दरवेळी वाटते कि, गरिबीमुळे तसेच आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी हेलोक रस्त्यावर हातगाडी लावून धंदा करतात परंतु बदलापूर शहरात वेगळेच चित्र पाहायला मिळत असून गरिबीमुळे नाही तर ठेकेदाराकडून महिला पगार घेऊन हातगाडी लावून अतिक्रमण करून रस्त्यावर धंदा केला जात असून त्यावर प्रशासनाने कारवाई करावी अशी भाजपा  शहराध्यक्ष शिंदे यांची मागणी आहे. 
  परप्रांतीयांना पगार सिस्टम करून बदलापूर पूर्व खरवई येथील बोरा, खान नावाचे ठेकेदार अनेक अनधिकृत्त हातगाडी लावत असून हे धाडस प्रशासनातील भ्रष्ट अधिकाऱ्यांशी संगनमत केल्याशिवाय करणे शक्यच नाही असे जाणकारांचे म्हणणे आहे. 
  नगरसेवक शिंदे पुढे म्हणतात कि, कुळगाव बदलापूर नगरपालिकेचे अधिकारी अमित सरमळकर हे दरवेळी सदर अनधिकृत हातगाड्यांवर कारवाई करतो म्हणून सांगतात परंतु प्रत्यक्षात कारवाई करत नाही. ह्या अधिकाऱ्यांना हातगाडी माफियांकडून हफ्ते मिळत असल्याने कारवाई होत नाही कि काय? याचीही चौकशी मुख्याधिकारी यांनी केली पाहिजे.

  आता बदलापूर विकासच्या बातम्या इंग्रजी वाचकांसाठीही उपलब्ध, बातम्यांच्या लिंकवर किल्क कर -
  Vote for Sai Vineet Joshi to make her the Royal singer...
  - MLA Kisan Kathore's presence at Shiv Sena corporator...
  - Badlapur station to Shashwat Park - Deepali stand...
  - Shiv Sena's MLA can be elected even if the candidate...
  - Finally, the campaign against anti-encroachment began...
  - Nationalist party to observe indefinite hunger strike...
  - ‘Michael's gambling den’ in Murbad municipality building...
  Kharvai handcart mafias causing chaos in the Badlapur city...

  2 comments:

  1. पण गांधी चौक ते खरवई ह्या रोडवरच्या अनाधिकृत बांधकाम पाडण्यात आले नाही
   याचे कारण नगराध्यक्ष आणि नगराधिपति देतील का? ?

   ReplyDelete
  2. After The India Show, TV18 delivered a week after week business news program India Business Report for BBC World. Indian watchers had extremely restricted choices (like public help telecaster Doordarshan, BBC and CNN) for watching the TV news. All Bangla Newspaper

   ReplyDelete

  Post Top Ad

  Post Bottom Ad