Header Ads

 • ताजा खबरें

  तुलसी आंगन सोसायटीच्या वतीने दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन

  बदलापूरः- दिवाळी व नववर्षाचे औचित्य साधुन बदलापूर पूर्व कात्रप येथील तुलसी आंगन सोसायटीच्या वतीने दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमात रसिकांचे मनोरंजन करण्यासाठी बदलापूरातील नवनिर्वाचित कराओके सिंगर ग्रुप, बदलापूर यांना आमंत्रित करण्यात आले होते.
  दिवाळी पहाट कार्यक्रमात अडीच तास चाललेल्या बहारदार गाण्यांनी कराओके सिंगर ग्रुप, बदलापूर ने सर्व रसिकांचे मने जिंकली. एकुण 10 स्थानिक गायकांनी अत्यंत सुरेल आवाजात मनमोहक पणे आपल्या कलेचे सादरीकरण केले असुन कार्यक्रमाचे सुत्रसंचालन राजु शिंदे यांनी केले होते.
  त्यावेळी कु.ब.न.प. चे माजी नगराध्यक्ष व भाजपाचे रामभाऊ पातकर, कात्रप प्रभाग क्र 11 चे माजी नगरसेवक नरहरी पाटील, स्थानिक नगरसेविका सौ. प्रमिलाताई पाटील उपस्थित होत्या.
  दिवाळी पहाट कार्यक्रमात आलेल्या सर्व पाहुण्यांसाठी तसेच रसिकांसाठी तुलसी आंगन सोसायचीच्या वतीने अल्पउपहाराची सोय देखील केली होती. उपस्थित रसिकांचे मनोरंजन केल्याबद्दल तसेच दिवाळी पहाट कार्यक्रमात कराओके सिंगर ग्रुप, बदलापूरच्या सर्व कलाकारांनी आपल्या कलेचे सादरीकरण केल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते मिठाई भेट देऊन कलाकारांचे सत्कार करण्यात आला.

  आता बदलापूर विकासच्या बातम्या इंग्रजी वाचकांसाठीही उपलब्ध, बातम्यांच्या लिंकवर किल्क कर -
  Vote for Sai Vineet Joshi to make her the Royal singer...
  - MLA Kisan Kathore's presence at Shiv Sena corporator...
  - Badlapur station to Shashwat Park - Deepali stand...
  - Shiv Sena's MLA can be elected even if the candidate...
  - Finally, the campaign against anti-encroachment began...
  - Nationalist party to observe indefinite hunger strike...
  - ‘Michael's gambling den’ in Murbad municipality building...
  Kharvai handcart mafias causing chaos in the Badlapur city...

  1 comment:

  1. Wow... our tulsi angan society in badlapur vikas newspaper

   ReplyDelete

  Post Top Ad

  Post Bottom Ad